Nagpur Politics Sarkarnama
विदर्भ

Nagpur Politics : पूर्व नागपूरसाठी आमदार अभिजित वंजारी दिल्लीला रवाना; काय निर्णय होणार?

Congress Abhijit Wanjarri aspiring for Assembly elections in East Nagpur Assembly Constituency :राष्ट्रवादीला सांगली पॅटर्नचा इशारा देणारे नागपूर पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी स्वतःच येथून निवडणूक इच्छुक असल्याचे समोर आले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव जाहीर केले आहे. या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये वाद सुरू आहे. आता त्यांच्या विरोधात कोण लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीला सांगली पॅटर्नचा इशारा देणारे नागपूर पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी स्वतःच येथून निवडणूक इच्छुक असल्याचे समोर आले आहे. ते आपल्या समर्थकांना घेऊन दिल्लीला रवाना झालेत.

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. येथे विजयाचा चौकार खेचण्यासाठी भाजपने, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांनी यापूर्वी सतीश चतुर्वेदी, अभिजित वंजारी आणि पुरुषोत्तम हजारे यांना पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर वंजारी यांनी आपला मोर्चा पदवीधर विधानसभा मतदार संघाकडे वळवला होता.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या पदवीधर मतदार संघातून त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव व नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांचा त्यांनी पराभव केला. असे असले तरी वंजारी यांनी पूर्व नागपूरवरील आपला दावा सोडला नाही. आपल्या आमदार निधीतून त्यांनी पूर्व नागपूरमध्ये अनेक कामे केली. ते पूर्व नागपूरमध्ये लुडबूड करीत असल्याने काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत विरोधकांसोबत त्यांचे वादही झाले होते. असे असले तरी विधान परिषदेत असल्याने ते विधानसभा निवडणूक लढणार नाही, असेच बोलले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी बघता ते येथून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

वंजारी यांनी हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यास नकार दिला आहे. असे झाले, तर सांगली पॅटर्नचाही इशारा त्यांनी दिला होता. याचे पडसाद नागपूर आणि मुंबईतही उमटले आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन पूर्व नागपूर मतदारसंघ दिला नाही, तर आम्ही काँग्रेसचे काम करणार नाही, आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना काँग्रेसच्या सतरंज्या उचलण्यासाठी झाली नाही, याकडेही लक्ष वेधले होते. मात्र याची फारशी दखल काँग्रेसने घेतली नाही. काँग्रेसच्यावतीने संगीता तलमले यांचे नाव येथून आघाडीवर आहे. दुसरीकडे अदलीबदलीची तयारी आघाडीने दर्शवल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, शहराचे माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांचे नाव समोर आले होते. त्यांना काँग्रेसने प्रवेश घेण्यास सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT