Krishna Khopde, Nitin Gadkari
Krishna Khopde, Nitin GadkariSarkarnama

BJP News : भाजप नेत्यांनी आपसातील वाद टाळले अन् खोपडे पुन्हा उमेदवार झाले ?

BJP Election Candidate Khopde : तब्बल 80 हजार मतांचे मताधिक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळवून देणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर पुन्हा भाजपने विश्वास दाखवला.
Published on

Nagpur Political News : लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक तब्बल 80 हजार मतांचे मताधिक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळवून देणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर पुन्हा भाजपने विश्वास दाखवला. खोपडे यांनी विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. आता काँग्रेस कोणाला उमेदवारी जाहीर करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष सुरू असल्याचे बोलले जाते. हे बघता गडकरी समर्थक म्हणून खोपडे यांना घरी बसवणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी गडकरी समर्थक म्हणून आपणास पक्षातून निलंबित केल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता. मात्र, खोपडे यांना तिकीट देऊन भाजपने 'हम साथ साथ है' हा संदेश दिला आहे.

साधा माणूस आणि सहज उपलब्ध होणारा आमदार अशी खोपडे यांची ओळख आहे. काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते, तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांनी पराभवाचा धक्का देऊन त्यांनी विधानसभा गाठली होती.

विधानभवनात प्रथमच पाय ठेवताच काँग्रेसचे नेतेही सतीश बाबुंचा पराभव करणारे कोण खोपडे आहेत हे कौतुकाने त्यांना भेटायला आले होते. त्यानंतर खोपडे यांनी विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. आता ते विजयाचा चौकार खेचण्यासाठी सज्ज झाले आहेत.

खोपडे नितीन गडकरी यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सलग तीन वेळा विजयी झाले असले तरी अँटीइंकंबंसीचा धोका असल्याचे दर्शवून त्यांचे तिकीट कापण्याचे उद्योग भाजपमधूनच सुरू होते, तशी चर्चा होती.

किमान आतातरी उमेदवार बदला, अशीही मागणी केली जात होती. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची नाराजी आहे, तीन वेळा निवडून आलेल्या आमदाराला तिकीट द्यायचे नाही, असे ठरले असल्याच्याही अफवा पसरवण्यात आल्या होत्या. या सर्व अफवाच ठरल्या आहेत.

Krishna Khopde, Nitin Gadkari
MVA News : मुंबईमध्ये मविआत ठाकरे गटच मोठा भाऊ; कोणाच्या वाट्याला किती जागा ?

खोपडे यांनीच पूर्व नागपूरमध्ये भाजपला सर्वप्रथम खाते उघडून दिले आहे. त्यांनी राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय छोटे असताना चतुर्वेदी यांना पराभवाचा धक्का दिला. तेव्हापासून चतुर्वेदी यांचे राजकीय अस्तित्व संपले. आज पूर्व नागपूर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

खोपडे यांच्या विरोधात चतुर्वेदी यांच्यासह या पूर्वी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आणि पुरुषोत्तम हजारे निवडणूक लढले आहेत. तीन वेळा काँग्रेस पराभूत झाल्याने हा मतदारसंघ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्व नागपूर मागितले आहे. तीन वेळा काँग्रेस येथून पराभूत झाली आहे. त्या मुळे आता आम्हला संधी द्या, अशी त्यांची मागणी आहे.

आम्ही फक्त काँग्रेसच्या सतरंज्या उचलायच्या का ? असा त्यांचा सवाल आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दूनेश्र्वर पेठे आणि प्रदेश सचिव शेखर सावरबांधे यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. मात्र, काँग्रेसने अद्याप हा मतदारसंघ सोडलेला नाही.

Krishna Khopde, Nitin Gadkari
Mahayuti Vs MVA : विक्रमगडसाठी महायुतीत धुसफूस; 'मविआ'कडून पवारसाहेबांच 'एकला चलो रे'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com