Bachchu Kadu  Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu News : " अनिल बोंडेंसारखे १० खासदार पाठवले तरी..." ; आमदार कडूंचं भाजपलाच ओपन 'चॅलेंज'

Vidarbha Politics : " इतरांपेक्षा आपल्याला भाजपकडूनच अधिक त्रास..."

जयेश गावंडे

Akola Politics : शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली. दरम्यान, मंत्रिपद आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आता भाजपवरच निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपल्याविरोधात आपल्याला निवडणुकीत पाडण्यासाठी दहा खासदार जरी आणले तरी आपण पडणार नाही,असं चॅलेंज आमदार बच्चू कडू यांनी भाजपला दिलं आहे. इतरांपेक्षा आपल्याला भाजपकडूनच अधिक त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) हे मंगळवारी वाशीम दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी थेट भाजपला आव्हान दिले. बच्चू कडू म्हणाले, माझ्या मतदारसंघात शिवसेनेसोबतच काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपच आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. भाजप एकीकडे सांगते की, सत्तेत या आणि दुसरीकडे भाजप मित्रत्व पाळत नसल्याची टीका त्यांनी केली.

कडू म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) हे खासदार अनिल बोंडे यांना सांगतात की, बच्चू कडू यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना मतदारसंघात पाडा. यावर कडू म्हणाले, मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खुले चॅलेंज दिले आहे. तुम्ही अनिल बोंडे यांच्यासारखे दहा खासदार आणखी पाठवा बच्चू कडूला निवडणुकीत पाडण्यासाठी. तरी बच्चू कडू निवडणुकीत पडणार नाही. तो निवडून येईलच. दरम्यान, बच्चू कडू यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अमरावती जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर...

राज्य सरकारने मला दिव्यांग मंत्रालय खाते दिले. मात्र, हे खाते केवळ नावापुरतेच शिल्लक आहे. ना कुठली गाडी, ना कुठले अधिकार. समाधान याचे आहे की, मी दिव्यांगांपर्यंत पोहोचू शकतो. अडचणी समजून घेऊन शकतो, येणाऱ्या काळात दिव्यांगाचे दुःख कमी करून तुमच्यासाठी लढत राहील.

दिव्यांगासाठी पाच टक्के निधी खर्च होणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक दिव्यांग घरकुल व विविध योजनांपासून वंचित राहतात. श्रीमंत अंत्योदयचे लाभार्थी आहेत, तर दिव्यांग माणूस योजनेपासून कोसो दूर आहे. हे सरकारचे अपयश आहे, असा घरचा आहेरही कडू यांनी सरकारला दिला.

देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्षे झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून राज्यात घरकुल योजना राबविल्या जाते. मात्र, अद्यापही ७५ टक्के दिव्यांगांना घरकुल मिळाले नाही. मी हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे घेऊन जाणार असून, दिव्यांगांना जर न्याय मिळाला नाही, तर उपोषणही करेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT