Nitin Deshmukh
Nitin Deshmukh Sarkarnama
विदर्भ

MLA Nitin Deshmukh News: आक्रमक आमदार देशमुखांच्या विरोधात उतरला एकेकाळचा कट्टर मित्र !

मनोज भिवगडे

Agitation for water supply scheme : अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. यासाठी त्यांना नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर जाण्याचादेखील प्रयत्न केला, पण तो फसला. आता एकेकाळचे त्यांचे मित्र असलेले प्रहारचे अनिल गावंडे त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. (Anil Gawande of Prahar has stood against them)

शिवसेनेच्या माध्यमातून कधीकाळी एका मंचावर असलेले दोन राजकीय मित्र सध्या अकोला जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्नावरून आमने-सामने ठाकले आहेत. राज्याच्या राजकारणात सत्तापालटानंतर चर्चेत आलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठा योजनेवरून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिल्यानंतर त्यांच्या विरोधात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी आंदोलनातून दंड थोपटले आहे.

अकोला महानगरपालिका हद्दीतील अमृत योजनेसाठी आरक्षित पाणी व बाळापूर ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी गेले चार दिवसांपासून लोकजागर मंचच्यावतीने संस्थापक अनिल गावंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. त्यापूर्वी आमदार नितीन देशमुख यांनी नागपूरपर्यंत संघर्ष पदयात्रा काढत उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर चालून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आमदार देशमुखांचा प्रयत्न उधळला असला तरी अनिल गावंडे यांनी थेट वाण धरण परिसरात आंदोलन सुरू करून आमदार देशमुख यांच्या आंदोलनाविरुद्ध शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे एकेकाळचे कट्टर मित्र पाणी प्रश्‍नावरून आमनेसामने आले आहेत.

कशावरून सुरू झाला वाद?

अकोला अमृत योजनेला स्थगिती न देता तो प्रकल्प रद्द करण्यात यावा. सोबतच बाळापूर येथील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनाही रद्द करण्यात यावी, या करिता २०१९ पासून सतत पाणी आरक्षणाला विरोध होत आहे. कवठा बॅरेज जवळ असताना बाळापूरसाठी वाण धरणातून पाणी देण्यासंर्भात विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने स्थगिती दिली; परंतु तो शासन निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.

पाणी आरक्षण निर्णयाला शासनाने (State Government) स्थगिती दिली असून, जाहीर केलेले पाणी आरक्षण शासनाने रद्द करावे, अशी मागणी होत आहे. अनिल गावंडे यांनी केलेल्या या मागणीला परिसरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतो आहे. दुसरीकडे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावरून आमदार नितीन देशमुख (Nitin Deshukh) यांनी रद्द केलेला शासन निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून जोर लावला आहे. त्यामुळे कधीकाळी राजकीय (Political) मित्र असलेले नितीन देशमुख व अनिल गावंडे पाण्याच्या प्रश्नावरून आमनेसामने आले आहेत.

आंदोलनात ठरवण्यात आली पुढील दिशा..

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या लोकजागर मंचाच्या आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) पाठिंबा देत शासनाने पाणी आरक्षण निर्णय लवकरात लवकर रद्द करावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

ग्रामसभेचा ठराव देत जाहीर पाठिंबा..

तेल्हारा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी ग्रामसभेच्या ठरावाची प्रत देत या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सरपंच संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आले.

थेट वाण धरणावरील पहिले आंदोलन..

अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या व नैसर्गिक दोन टेकड्यांचा मध्य साधून तयार करण्यात आलेल्या वाण धरणाच्या निर्मितीचे काम सन १९९९ साली पूर्ण झाले. सन २००२ साली प्रत्यक्षात शेतीला पाणी मिळाले. जवळ जवळ १८ हजार हेक्टर क्षेत्रावर वाण धरणाचे पाणी पोहोचले व पिके आनंदाने डोलू लागली.

त्यावेळी ६२ टक्के पाणी हे शेतीसाठी दिल्या गेले. मात्र, हेच पाणी आता पिण्यासाठी वळवण्यात आल्याने शेतीसाठी केवळ १४ टक्के पाणी आरक्षित आहे. शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतीसाठी हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असून, प्रत्यक्ष धरणावर होत असलेले पहिलेच आंदोलन आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT