Gopichand Padalkar Sarkarnama
विदर्भ

Gopichand Padalkar News : आमदार गोपीचंद पडळकरांचं ध्येय ठरलं; म्हणाले," धनगर समाजाला..."

Deepak Kulkarni

सुभाष बिडे

Ghansavangi News : सत्तर वर्षांपासून ज्या प्रश्‍नांवर धनगर समाज झगडतो, तो प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे चार पिढ्यांची माती झाली. पुढील पिढीच्या कल्याणासाठी व राजकारण, समाजकारण, नोकरीत धनगर समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा घ्यायचा व शिक्षणांची गंगा शेवटच्या तळागाळातील धनगर समाजबांधवापर्यंत नेणे गरजेचे आहे.

यासाठीच धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेशांच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे हेच आपले एकमेव ध्येय असल्याचे भाजप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर घनसावंगी येथे गुरुवारी धनगर(Dhangar) समाजाच्या आरक्षणाच्या एल्गार मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी न्यायालयात प्रलंबित असून, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याची सुनावणी होऊन अंतिम निकाल हा नाताळानंतर देण्यात येणार आहे. या आरक्षणाची लढाई आपल्याला कायमस्वरूपी लढायची आहे. त्यासाठी धनगर समाज बांधवांनी रस्त्यांवर उतरण्याची गरज असून, तेलंगणा राज्यातील सरकारने हस्तक्षेप करून आरक्षणाचे परिपत्रक काढले आहे. (BJP Political News)

गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) म्हणाले, तेलंगणा सरकारप्रमाणे आरक्षण तयार करण्याची आवश्यकता आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार तयार असून, दोन ते तीन दिवसांत आरक्षणासाठी समिती नियुक्त करण्यात येणार आहे.

ज्यावेळी धनगर समाज जागा होतो. त्यावेळी प्रस्थापित समाजाची झोप उडते. आपल्या केसाला धक्का लागल्यास धनगर समाज पेटून उठेल, या भावनेतून प्रस्थापितांना काही करता येत नाही. तुमच्या जिवावरच आरक्षणाची लढाई लढत असून, आगामी काळात आपण प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. तसेच आरक्षण लढाईसंबंधी जनजागरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोटारसायकल रॅलीने पडळकरांचे स्वागत

घनसावंगीत दाखल होण्यास आमदार गोपीचंद पडळकर यांना पाच वाजले तरी सकाळपासून धनगर समाज बांधव सभास्थळाबरोबर हेलिपॅडच्या जागेवर ठाण मांडून होते. शासकीय विश्रामगृहासमोर निर्माण करण्यात आलेल्या हेलिपॅडपासून धनगर समाज बांधवांनी अत्यंत जल्लोषांच्या वातावरण सभास्थळापर्यंत रॅली काढून गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या आरक्षणाच्या लढाईचे जोरदार समर्थन करीत स्वागत केले.

(Edited By Deepak Kulkarni)  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT