PCMC News : पवार अन् ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसल्याने त्यांचा पक्ष गेला; बावनकुळेंनी डिवचले

Shirur Lok Sabha Election News : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते
Chandrashekhar Bawankule News
Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'महाविजय- २०२४' अभियान सुरू केले असून, त्यासाठी प्रत्येक मतदारसंघ ते पिंजून काढीत आहेत. त्याअंतर्गत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 'शिरूर'चा दौरा गुरुवारी (ता.१२) केला.

मतदारसंघाच्या उत्तर टोकाकडून सकाळी तो सुरू झाला अन् त्याची सांगता दक्षिणेला भोसरीत झाली. तेथे बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) बोचरा हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वोत्कृष्ट काम केले. तरी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी फडणवीसांना थांबवले, पण इथले इथेच फेडावे लागले. आज त्यांची परिस्थिती काय आहे ? ही महाराष्ट्राची जनता पाहते आहे. ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद गेले, पार्टी गेली. असेच शरद पवारांचे आहे.

Chandrashekhar Bawankule News
PCMC News : अजितदादांचा गड चोहोबाजूंनी घेरला; रोहित पवार, जयंत पाटलानंतर आता सुप्रियाताई मैदानात

साडेतीन जिल्ह्यांचे प्रधानमंत्री ते बनले होते, अशी तोफ बावनकुळेंनी दिघी, भोसरी येथे रॅलीत डागली. या वेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, ओबीसी (OBC) मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, शिरूर निवडणूक प्रमुख महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, संयोजक विजय फुगे, पुणे अध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.

मोदींना हरवण्यासाठी मुंबईत 28 पार्टी एकत्र आल्या. त्यातील एका पार्टीचा मुख्यमंत्री स्टॅलीनचा मुलगा उदयनिधी म्हणतो ''या देशातील हिंदू संस्कृती संपवून टाकू, त्याचा बदला देशातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशारा बावनकुळेंनी या वेळी दिला. पुढील वर्षी मे किंवा जून महिन्यात लोकसभा निवडणूक होईल, असे ते म्हणाले.

शिरूरमधील ९० टक्के मतदार मोदींना मतदान करेल, तेथील खासदार राज्यात सर्वांत जास्त मतांनी निवडून येईल, असा दावा त्यांनी केला. शिरूरमध्ये लोकसभा प्रवास योजना आणि घर चलो अभियान सक्षमपणे राबवल्याबाबत त्यांनी या मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आणि भोसरीचे आमदार महेश लांडगेंचे या वेळी कौतुक केले.

Edited by : Amol Jaybhaye

Chandrashekhar Bawankule News
Maharashtra politics : राजकारण फिरले ; ज्या फडणवीसांनी सत्तेत आणले त्यांनाच दिल्लीत पाठवण्याची शिंदे गटाला घाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com