Rajendra Patni Sarkarnama
विदर्भ

Rajendra Patni Death: कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी घेतला अखेरचा श्वास

जयेश विनायकराव गावंडे

Rajendra Patni Death News : वाशीम जिल्ह्यातील कारंजाचे आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी यांचे शुक्रवारी (ता. 23) निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून होते आजारी होते. राजेंद्र पाटणी हे भाजपचे आमदार होते. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पूर्वी ते शिवसेनेत कार्यरत होते.

विधान परिषद आणि विधानसभेत त्यांनी वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. 1997 ते 2003 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले. 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते कारंजातून विजयी झाले. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला.

2014 व 2019 मध्ये भाजपकडून ते कारंजा विधासभा निवडणुकीत विजयी झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. अभ्यासू व्यक्तिमत्त्व अत्यंत मृदू स्वभाव व जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेले नेते म्हणून ते परिचित होते. 2024 मधील लोकसभा निवडणुकीआधी पाटणी यांच्या निधनामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करीत पंतप्रधान मोदींनी पाटणी यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त केली. महाराष्ट्र विधानसभेतील आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाने दुःख झाले. अनेक सामुदायिक सेवा उपक्रमांमध्ये ते आघाडीवर होते आणि लोकांसाठी प्रभावी आवाज होते. पक्ष बळकट करण्यातही त्यांनी स्तुत्य भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना, अशा शब्दात त्यांनी संवेदना व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते आजारी होते. मतदारसंघात त्‍यांचे सुपुत्र ज्ञानक पाटणी यांचा वाढता सहभाग चर्चेचा विषय ठरला होता. अनेक विकास कामाचे भूमिपूजन देखील ज्ञानक पाटणींकडून करण्यात येत होतेे. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत ते भाजपचा चेहरा राहतील का ? यावरून चर्चेला उधाण आले होते. ज्ञानक पाटणी हे भाजप जैन प्रकोष्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्य करतात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले असून आरोग्य शिबिर आदी उपक्रमात ते सहभागी होताना दिसतात.

2021 मध्ये वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. हा वाद एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत विकोपाला गेला होता. या वादामुळे खळबळ उडाली होती. त्यावेळी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला झाला होता. वाशीम यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मधील राजकीय वैर तसं जूनेच होते.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT