Washim : कर्जमुक्तीचे अर्ज शेतकरी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदेंना पाठविणार

Loan Waiver : वाशिम जिल्ह्यात स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान
Loan Waiver Narendra Modi & Eknath Shinde.
Loan Waiver Narendra Modi & Eknath Shinde.Sarkarnama
Published on
Updated on

Farmer's Issue : कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अर्ज पाठविणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.

युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांच्या संयोजनात स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान राबविण्यात येत आहे. विदर्भ मराठवाड्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येणार आहेत. वाशीम येथे त्यांनी ही माहिती दिली.

Loan Waiver Narendra Modi & Eknath Shinde.
Washim News : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाची निवडणूक ठरणार रंगतदार

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी विषयावर बोलताना स्वाभीमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी सांगितले की, चार वर्षांपासून अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अश्या विविध संकटामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली सरकारने सोयाबीन, तूर, कांदा, कापूस, हरभरा, गहू व सर्वच पिकांचे भाव पाडले आहेत. एकीकडे सरकार निर्यातबंदी लावते तर दुसरीकडे आयात करते. त्यामुळे शेतकरी रसातळाला गेले आहेत.

शेतकऱ्यांना आता कर्ज भरणे शक्य नाही. परिणामी आत्महत्या वाढत आहेत. हे रोखण्यासाठी सरकारने मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करून सातबारा कर्जमुक्त करावा, यासाठी ‘कर्जमुक्त सातबारा’ हे अभियान १ जानेवारी २०२४ पासून विदर्भ व मराठवाडयातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत. त्यानंतर जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज सादर करण्यात येतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे ही आमची भूमिका असून मागण्या मान्य न झाल्यास पक्षाच्यावतीने पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवीन वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान हे अभियान राबवणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पणा राबवून सोयाबीन कापूस दर वाढीची मागणी केली होती. आता त्यांना त्याप्रमाणे दर द्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात येणार आहे. अभियानाची सुरुवात 1 जानेवारी 2024 रोजी करण्यात येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे प्रश्न घेऊन लढत आहे. नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटेने आता नवा नारा दिला आहे. त्यामुळे नवीन अभियान स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षापासून राबविणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीवर घेतलेले सर्व प्रकारचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कर्जमुक्त करावा, यासाठी हे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असेही युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सांगितले.

Edited by : Prasannaa Jakate

Loan Waiver Narendra Modi & Eknath Shinde.
Washim : शरद पवार गटच नव्हे, महाविकास आघाडीत संचारला जोश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com