Ravi Rana Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Ravi Rana Vs Uddhav Thackeray : अमरावतीत राजकारण तापलं; आमदार राणांची ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली; '' नामर्द मुख्यमंत्री...''

Amravati Politics : '' कोरोना काळात उध्दव ठाकरे हे 'माझे कुटंब माझी जबाबदारी' म्हणत मातोश्रीवर लपून बसले होते...''

सरकारनामा ब्यूरो

Amravati : शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. सोमवारी (दि. १०) अमरावती येथे पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजप हा राजकारणातील नामर्द पक्ष असल्याची घणाघाती टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देतानाच आमदार रवी राणा यांनी ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

आमदार रवी राणी(Ravi Rana) यांनी उध्दव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरुन घणाघाती टीका केली आहे. राणा म्हणाले, उध्दव ठाकरे हे नामर्द मुख्यमंत्री आहेत. ते आता चार वर्षानंतर अमरावतीत येत आहेत. पण ज्यावेळी कोरोना काळात या जिल्ह्यात ऑक्सिजन मिळत नव्हता, बेड मिळत नव्हते. शेतकरी आत्महत्या करत होते. त्यावेळी येथील बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे नेते व पदाधिकारी त्यांना फोन लावत होते. त्यावेळी ठाकरेंनी फोन देखील उचलला नाही असा गंभीर आरोप राणा यांनी केला आहे.

राणा काय म्हणाले..?

कोरोना काळात उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) हे 'माझे कुटंब माझी जबाबदारी' म्हणत मातोश्रीवर लपून बसले होते. अमरावतीच्या खासदारांना १४ दिवस जेलमध्ये टाकून नामर्दानगी मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी केली अशी घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांना विदर्भाच्या महिला साडीचोळीचा आहेर देखील देणार असल्याचा खोचक टोलाही राणा यांनी यावेळी लगावला.

उध्दव ठाकरे काय म्हणाले होते..?

शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावती येथे जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्यांना दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागत आहे. देशातील सर्व विकून दुसऱ्या पक्षांतील लोकांना विकत घेण्याची भाजपवर का वेळ आली? हातात सर्व यंत्रणा असतानाही भाजप(BJP)ला जिंकून येण्याचा आत्मविश्वास राहिला नाही. यातून विरोधकांना संपवण्याचा डाव भाजपचा असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे.

यावेळी त्यांनी ईडी,सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय यंत्रणा बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हानही दिलं. पण भाजप हा राजकारणातील नामर्द पक्ष असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT