MVA And Amravati Loksabha : शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते रविवारी (ता. ९) रात्री अमरावतीमध्ये दाखल झाले. ठाकरे यांचे काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांशी बोलताना ठाकरे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले. दरम्यान, ठाकरे जिल्ह्यात असतानाच काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. (Latest Political News)
अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनंतराव गुडे तीन तर आनंद आडसूळ दोन वेळा खासदार झाले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगितला. तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीकडून येथून शिवसेनेचा उमेदवार लढणार असल्याचे संकेत ठाकरेंनी दिले आहेत. असे असतानाही काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. अमरावती लोकसभा काँग्रेसला का मिळावी, याबाबत आमदार यशोमती ठाकूर यांनी कारणही स्पष्ट केले.
अमरावती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे राहिला पाहिजे, असाच प्रयत्न राहीन, अशी भूमिका आमदार यशोमती ठाकूर यांनी मांडली. यशोमती ठाकूर म्हणाल्या, "आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेसकडे आली पाहिजे. कारण आताच्या खासदार नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मतदानावर निवडून गेल्या आहेत. त्या आता दलबदलूपणा करत आहेत. मात्र या मतदारसंघात काँग्रेसचे मतदान जास्त आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा."
यावेळी ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर सडकडून टीका केली आहे. ठाकूर म्हणाल्या, "राणा दाम्पत्याने आता आत्मचिंतन करावे. जे स्वतः दलबदलू आहेत. ते कायमच गोंधळ घालत असतात. ज्यांच्या मतांवर निवडून येतात त्यांचा ते सन्मान करत नाहीत ती कुणाचाही सन्मान करणार नाही. अमरावतीत विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. आमरावतीची काही मंडळी संविधानाचा आराखडा तयार करण्याच्या समितीत होते. या लोकांनी मात्र अमरावतीला बदनाम केले. जिधर बम उधर हम असा त्यांचा विषय आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.