Vijay Rahangdale Sarkarnama
विदर्भ

Gondia Irrigation Project : ‘कलपाथरी’ प्रकल्पग्रस्तांना पट्टे वाटपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Vijay Rahangdale : गोरेगाव तहसीलमधील प्रश्नावर गोरेगाव-तिरोड्याचे आमदार सरसावले

अभिजीत घोरमारे

Gondia Irrigation Project : कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या संपादित जमिनीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष आणि विलंब होत असल्याने आमदार विजय रहांगडाले यांनी आता प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे पट्टे वाटप व इतर विषयांना घेत त्यांनी गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

प्रलंबित विषयांवर आमदार रहांगडाले यांनी या वेळी चर्चा केली. कलपाथरी मध्यम प्रकल्पात संपादित केलेल्या भूखंडधारकांना पट्टे वाटप करण्यात यावेत, अशा सूचना आमदार विजय रहांगडाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कलपाथरी मध्यम प्रकल्पग्रतांना पट्टे वाटपचा मुद्दा सतत रेंगाळला आहे. अशात भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे सत्र लावून धरले आहे. गोरेगाव येथे श्रीरामपूर पुनर्वसन क्षेत्रातील नागरिकांची आखीव पत्रिका तयार करून त्यांच्या नावे मालकी हक्क मिळणे, खोलगट भागातील प्लॉट बदली करून पट्टे देणे, खुल्या सरकारी जागेचे परिसीमन करून विकास करणे, कलपाथरी मध्यम अधिकाऱ्यांना निर्देश प्रकल्पांतर्गत सोनारटोला, भगतटोला, ओकाटोला या गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना पट्टे वाटप करून मालमत्तापत्रक तयार करणे आदी रहांगडाले यांनी पाठपुरावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाघ प्रकल्पाच्या पुजारीटोला धरण बुडीत क्षेत्रातील संपादित झालेल्या पठानटोला, निंबा, हलबीटोला, चीचटोला येथील लोकांचे पुनर्वसन करण्यात आले, परंतु त्यांचे गट वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यात आलेले नाही. सन 1976 पूर्वी अस्तित्वात असलेल्या तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार महाराष्ट्रात प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन करण्यासाठी अधिनियम आहे. 1976 व 1986 मध्ये हा अधिनियम तयार करण्यात आला. त्यानुसार पात्र प्रकल्पबाधितांच्या वर्ग दोनमधील जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश आमदार विजय रहांगडाले यांनी बैठकीत निर्देश दिले आहेत.

कलपाथरी मध्यम प्रकल्प हा गोंदियातील गोरेगाववासियांसाठी महत्त्वाकांक्षी आहे. अशात प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण गोरेगाववासियांनी व्यवस्थित पार पाडून दिले. त्यानंतरही त्यांच्या हिश्श्याच्या जमीनवाटपाबाबत सरकार कामचलाऊ धोरण अवलंबित होते. त्यामुळे प्रशासनाबद्दल गोरेगाववासियांमध्ये उठत असलेली संतापाची लाट बघता गोरेगाव-तिरोडा विधानसभा संघाचे भाजप आमदार विजय राहांगडाले यांनी वेळीच अधिकाऱ्यांची बैठक लावत कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या पट्टेवाटपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत विलंब झाला असला, तरी गोरेगाववासियांमधून ही समस्या निकाली लागत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आमदार रहांगडाले यांच्यासह बैठकीत जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण भगत, प्रवीण पटले, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार के. के. भदाणे, नायब तहसीलदार नागपुरे, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता टेंभुर्णे, खंडविकास अधिकारी सुबोध पाटील, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, माजी नगरसेवक रेवेन्द्र बिसेन, हिरालाल रहांगडाले, रेखलाल टेंभरे, मन्साराम मारबदे व संबधित यंत्रणेचे मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT