Sharad Pawar- MP Amar Kale Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar : खासदार अमर काळेंनी नाकारली पवारसाहेबांची 'ती' ऑफर !

Chaitanya Machale

Wardha News : विदर्भातून लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांना दिल्लीत राहण्यासाठी घर अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे खासदार काळे यांना पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत आपले एक घर सुचवून तेथे राहण्याची ऑफर दिली.

मात्र काळे यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली. काळे यांनी स्वत:च माहिती दिली असून नकार देण्यामागे काही ठोस कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वर्धा लोकसभा निवडणुकीत अमर काळे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयी झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात कट्टर काँग्रेसी असलेल्या काळे यांना स्वत:च्या पक्षात घेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवारी दिली. तुतारी चिन्हावर निवडणूक जिंकत काळे विदर्भातील एकमेव खासदार ठरले आहेत. खासदार म्हणून निवडून पहिल्यांदाच दिल्लीत गेलेल्या खासदारांना हक्काचे घर पाहिजे असते. काळे हे पहिल्यांदाच निवडून गेलेले आहेत.

खासदारांना राहण्यासाठी दिल्लीत प्रशस्त फ्लॅट दिले जातात. ज्येष्ठतेनुसार या निवासांचे वाटप केले जाते. मात्र सध्या खासदारांना निवासांचे वाटप न झाल्याने नव्याने विजयी झालेले खासदारांनी आपला मुक्काम महाराष्ट्र सदनात ठेवला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) बहुतांश खासदार सध्या तेथेच राहत आहेत. खासदार काळे यांना घर मिळाले नसल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राहण्याासाठी आपले एक घर सुचविले. त्या घरात पवार यापूर्वी राहत होते. तेथे राहण्याची ऑफर पवारांनी त्यांना दिली, मात्र खासदार काळेंनी विनम्रपणे ही ऑफर नाकारली.

शरद पवार आणि नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांच्यात कौटुंबिक स्नेहाचा धागा आहे. काळे यांचे सासरे अशोक शिंदे यांचा पवार कुटुंबाशी घरचे संबध आहेत. केंद्रात 14 वर्षे कृषिमंत्री राहिलेले अण्णासाहेब शिंदे यांचे अशोक शिंदे हे सुपुत्र होत. इतकेच नव्हे तर अण्णासाहेब शिंदे प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून पवार हेच जबाबदारी संभाळत आहेत. या नात्याने शरद पवार आणि खासदार अमर काळे यांचे नाते सासरे – जावयाचे आहे. त्यामुळेच तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी स्वतःचे घर ऑफर केले असावे, अशी चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT