Nagpur : कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के कर लावला असून त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. "केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही," असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी म्हटलं आहे. यावरून भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी पवारांवर निशाणा साधला आहे.
"पवार कृषीमंत्री असताना त्यांनी अनियंत्रित काळासाठी निर्यात बंदी केली होती. केंद्र सरकारने आता निर्यात बंदी केली नाही केवळ कर लावला. हा कर केवळ साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी लावला आहे. शरद पवारांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम केले नाही. आता केवळ व्यापाऱ्यांसाठी गळे काढण्याचे काम करताहेत," असा आरोप बोंडेंनी केला आहे.
अनिल बोंडे म्हणाले, "कराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सरकारने नाफेडकडून दोन लाख टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा संकल्प केला आहे. कांद्याला २४१० रुपयांचा भाव जाहीर केला. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली. व्यापाऱ्यांकडून साठेबाजार होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. विरोधकांना बोलण्याचे नाक राहिले नाही, त्यामुळे ते आंदोलन करीत आहेत,"
केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांनी रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे विरोधी पक्षांमधील नेते केंद्र सरकारवर टीका करू लागले आहेत. या निर्णयामुळे रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील सरकारला धारेवर धरलं आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.