Shivsena News  Sarakrnama
विदर्भ

Shivsena News : ठाकरेंचा 'हा' संदेश घेऊन खासदार अरविंद सावंत विदर्भात

Arvind sawant News : शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मतभेद, मतभेद विसरून एकदिलाने व एकजुटीने कामाला लागा असे निर्देश खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Rajesh Charpe

Akola News : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी सध्या जोरात दिसत आहे. त्यामुळे आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखण्यास सुरुवात केली.

सर्वसामान्य नागरिक शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्पर राहिले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत नागरिकांचा मिळालेला जनाधार अधिक भक्कम करण्यासाठी सर्वसामान्य जनतेत जाऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा, शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मतभेद, मतभेद विसरून एकदिलाने व एकजुटीने कामाला लागा असे निर्देश माजी केंद्रियमंत्री शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant ) यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉल येथे घेण्यात आली. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला असून शिवसेनेसोबत जनमत अधिक भक्कम आहे. शिवसेना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत असल्याने व त्यांच्या हितासाठी लढत असल्याने शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली.

आगामी विधानसभेत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्याने एकजुटीने कामाला लागण्याची आवश्यकता असून मनभेद व मतभेद विसरावे लागतील. लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी व प्रखर हिंदुत्वाचा विचार ज्वलंत ठेकण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने सज्ज व्हावे असेही सावंत म्हणाले. (Shivsena News)

विधानसभानिहाय घेतला आढावा

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांनी पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, आजी माजी आमदार, खासदार, जिल्हासंघटक, जिल्हा समन्वयक, विधानसभाप्रमुख, विधानसभासंघटक, विधानसभा समन्वयक, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका, तालुका संघटिका, शहरसंघटिका, शेतकरी आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेकांचे म्हणणे ऐकून घेतले.

मतदार संघातील उमेदवारांची चाचपणी

पश्चिम विदर्भात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात खा. अरविंद सावंत यांच्याकडून अमरावती 8, बुलढाणा 7, वर्धा 4, यवतमाळ 7 अशा विधानसभा उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. या मतदार संघात कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो ? संबंधित उमेदवाराची जमेची बाजू आहे त्यांची बलस्थाने, संघटनात्मक बांधणी, एकनिष्ठता, कार्य करण्याची पध्दती यासह अनेक बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक लढविण्यासाठी नव्हे तर मतदार संघात निवडून येणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असेल, असेही खा. अरविंद सावंत यांनी सांगितले.

उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी !

शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभेत उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार शक्ती प्रदर्शन करताना सुद्धा पाहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या समर्थकांसह हजर होते.

या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh ), माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार विश्वास नांदेकर, संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाळकर, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, अमरावती संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, यवतमाळचे संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अमरावतीचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT