Vinayak Raut, Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Vinayak Raut News : शरद पवारांकडे पाठ फिरवणारा गट मोदींना दैवत मानतो ; राष्ट्रवादीत फूट की गद्दारी ? ; विनायक राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

Hingoli : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली की नाही, यावर चर्चा होत असताना शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार विनायक राऊतांनी मोठं विधान केलं आहे. "राष्ट्रवादीमधून एक मोठा गट बाहेर पडला व बाहेर पडलेल्या गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं दैवत मानत शरद पवारांकडे पाठ फिरवली आहे, आता ही फूट म्हणायची का गद्दारी हा त्यांचा प्रश्न आहे," असे राऊत म्हणाले.

मुंबईत एक सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये शरद पवार ताकदीने उभे राहणार, असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांची उद्या (रविवारी) हिंगोलीमध्ये सभा आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत हिंगोलीत आले होते. त्यावेळी ते माध्यमाशी बोलत होते.

यावेळी माध्यमांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार का असा सवाल त्यांना केला. "अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठीच भाजपमध्ये गेले आहेत. त्यांनी आतापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची बळकवायला सुरुवात केली आहे, मंत्रालयातील वाररूम देखील ताब्यात घेतली आहे, असे म्हणत राऊतांनी उजव्या हाताचा ठेंगा दाखवला.

खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यात बोलताना “अजित पवार पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही”, असं विधान केलं होतं. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी त्या वक्तव्याचं समर्थन करताना “यात कोणताही वाद नाही”, असं म्हटलं. मात्र, नंतर अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं आपण म्हटलोच नसल्याचा घुमजाव शरद पवारांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार २०१९ प्रमाणेच पुन्हा माघारी फिरण्यापासून ते शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होण्यापर्यंत सर्व चर्चा सुरू आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT