Sharad Pawar News : ते मुर्खांच्या नंदनवनात राहतात ; भाजपच्या दोन नेत्यांवर शरद पवारांचे शरसंधान

Maharashtra Politics : या पक्षाच्या नेतृत्वाची पातळी किती घसरली, हे लक्षात येते.
Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar,Sudhir Mungantiwar
Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar,Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : "मी भाजपसोबत जाणार," असे खुळचटपणाचे विधान काही नेत्यांकडूनच केले जात आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, ते मुर्खांच्या नंदनवनात राहतात. त्यांचे विधान अत्यंत खुळचटपणाचे आहे. असे विधान करणाऱ्या या पक्षाच्या नेतृत्वाची पातळी किती घसरली, हे लक्षात येते," अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजप दोन नेत्यांवर शरसंधान साधले.

Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar,Sudhir Mungantiwar
Police recruitment News : पोलीस होण्याचे स्वप्न भंगले ; धावण्याचा सराव करणाऱ्या दोन युवकांचा अपघाती मृत्यू

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसापूर्वी "भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी व्हावे, अशा पद्धतीने शरद पवारांची वाटचाल सुरू आहे," असे विधान केले होते. याबाबत पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर पवारांनी बावनकुळे आणि मुनगंटीवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघात केला. या दोन्ही नेत्यांच्या विधानाचा समाचार पवारांनी घेतला.

Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar,Sudhir Mungantiwar
Sharad Pawar News : पक्ष म्हणजे आमदार नव्हेत.. ; राष्ट्रवादीत फूट नसल्याचा शरद पवारांचा पुनरुच्चार ; मी राष्ट्रीय अध्यक्ष..

"मोदी सरकारच्या कार्यकाळात, येत्या वर्षभरात केंद्र सरकारकडून जी धडाडीने कामे होणार आहेत,ती बघता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही मोदींचे नेतृत्व मान्य करून भाजपसोबत येतील," असे बावनकुळे म्हणाले होते.तर शरद पवारांची वाटचाल ही एनडीएकडे सुरू असल्याचे मुनगंटीवार म्हटले होते.

"आमच्यातून काही आमदार वेगळे झाले ही वस्तूस्थिती आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हेत, देशपातळीवरील संघटनेत फूट नाही, काही आमदार पक्षातून बाहेर गेल्याने पक्षात फूट पडत नाही. मी राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत," असे सांगत पक्षात फूट नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com