Congress News Sarkarnama
विदर्भ

Congress and Muslim Politics News : पक्षात डावललं जात असल्याबद्दल काँग्रेसमधील मुस्लिम नेते, पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त!

Vidharbha Congress Muslim leaders Meeting : विदर्भ काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी घेतली बैठक; लोकसभेच्या निवडणुकीतही एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी दर्शवली होती.

Rajesh Charpe

Congress Muslim leaders : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मतदान करणाऱ्या मुस्लिम समाजाची काँग्रेसवर नाराजी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. लोकसभा, राज्यसभा आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नसल्याने मोठा असंतोष निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

एवढंच नाहीतर जर असेच सुरू राहिले तर विधानसभेतही डावलल्या जाऊ अशी भीती समाजातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विदर्भातील काँग्रेसच्या मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेकमध्ये समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी दर्शवली होती.

खासदार वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांच्या जागी नसीम खान यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र तीसुद्धा नाकारण्यात आली. यावरून काही जणांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तसेच महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या.

लोकसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने सर्व वाद शांत झाले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत याची भरपाई करावी अशी मागणी रेटण्यात आली होती. विशेष म्हणजे यवतमाळ येथील आमदार वजाहत मिर्झा यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला असताना त्यांच्या जागेवरही समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याने आता मोठा असंतोष मुस्लिम समाजात खदखदत असल्याचे दिसत आहे. याशिवाय असेच सुरू राहिल्यास विधान परिषदेही डावलल्या जाऊ अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

मुजफ्फर हुसैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत डॉ. नदीम, प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव शकूर नागनी, जिया खान, आरिफ बेग, महाराष्ट्र-गोवा बार काँसिलचे अध्यक्ष ॲड. आसिफ कुरेशी, प्रदेश कॉंग्रेसचे(Congress) सचिव आर.एम खान नायडू, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद आसिम अली, सामाजिक कार्यकर्ता इकराम हुसैन, गौस खान, नूर अली, माजी नगरसेवक जुल्फिकार अहमद भुट्टो, नाजिम पहलवान आदी उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या मतांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले असल्याचा आरोप भाजप(BJP) नेत्यांमार्फत केला जात आहे. शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी वारंवार हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम आणि अनुसूचित जातींच्या नाराजीचा फटका बसल्याचे भाजपचे नेते मान्य करीत आहे. असे असतानाही काँग्रेस डावलत असल्याची भावना आता मुस्लिमांमध्ये जोर धरू लागल्याचे दिसून येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT