Chandrashekhar Bawankule BJP Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule BJP : जिल्हाध्यक्षांनी निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्याला मोठी संधी? कारण त्याच्या घरी पोचले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे!

Nagpur BJP Chief Suspends Prakash Tekade Chandrashekhar Bawankule Meets Him at Home : भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी निलंबित केलेले वरिष्ठ पदाधिकारी प्रकाश टेकाडे यांच्या घरी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली.

Rajesh Charpe

Nagpur BJP chief suspension : भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी निलंबित केलेले वरिष्ठ पदाधिकारी प्रकाश टेकाडे यांच्या घरी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन सर्वांनाच धक्का दिला.

या भेटगाठीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या भेटीने टेकाडे यांचे निलंबन मागे घेतले जाईल असा कयास लावला जात आहे. दुसरीकडे जिल्हाध्यक्षांचा निर्णय फिरवल्यास अंतर्गत धुसफूस आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विद्यमान जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे वर्षभरापूर्वी भाजपमध्ये दाखल झाले. ते केदारांचे कट्टर समर्थक होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत (Election) त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सावनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, असे त्यावेळी बोलले जात होते. मात्र भाजपने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली. कालपरवा पक्षात आलेल्या कुंभारे यांना अध्यक्ष केल्याने भाजपच्या निष्ठावंतांना हे अद्यापही पचनी पडलेले नाही.

टेकाडे हे 35 वर्षांपासून भाजपचे (BJP) काम करीत आहे. विधानसभेसाठी ते इच्छुक होते. मात्र त्यांच्या मनासारखे घडले नाही. त्यानंतर कुंभारे यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आल्याने ते नाराज होते. त्यांच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर कॉमेंट्स केल्या होत्या. टेकाडे हे विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट करीत होते. त्यावेळी पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली बाजू मांडणे अपेक्षित होते.

परंतु, त्यांनी तसे केले नाही. पक्षाने दिलेल्या उमेदवाराबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अलीकडेच अ‍ॅड. टेकाडे यांचा एक व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित झाला. त्यामुळे त्यांचे तत्काळ सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याचे म्हणणे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचे आहे.

भाजपने अ‍ॅड. टेकाडे यांना यापूर्वी पंचायत समिती सभापती, दोनदा समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष व संघटनेत भाजप तालुकाध्यक्ष, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष, अशा मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.

जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून निरीक्षक म्हणून माजी खासदार सुनील मेंढे यांना पाठविण्यात आले होते. त्यांनी अध्यक्ष निवडताना वय 60 ते 62 असावे. तसेच बाहेरच्या पक्षातून आला असेल तर किमान दोन संघटनात्मक निवडणुकीत भाग घेणे आवश्यक होते. किमान सहा वर्षे पक्षात येऊन व्हायला हवे. वरील नियमांचे पालन न होता केवळ 6 महिन्यांपूर्वी आलेल्या मनोहर कुंभारे यांना अध्यक्षपद दिल्याचा प्रकाश टेकाडे यांचा आरोप होता.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत टेकाडे यांच्या निलंबनामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता होती. हे बघून चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी भेट दिल्याचे बोलले जात आहे. या भेटीमुळे टेकाडे यांचे निलंबन लवकरच मागे घेतले जाईल असा तर्क लावल्या जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT