Chandrashekhar Bawankule 1 Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रातील अनेक नेते नुसते नौटंकी करतात; बावनकुळे यांचे विधान

Chandrashekhar Bawankule Criticizes MLAs Speaking Outside Instead of Assembly Nagpur BJP : भाजप मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना वैयक्तिक नव्हे, तर त्यांच्या आंदोलनाचा आपण नौटंकी म्हटल्याचे सांगितले.

Rajesh Charpe

BJP Revenue Minister Nagpur : अनेक आमदार आणि नेते विधानसभेत काही बोलत नाहीत. सभागृहात प्रश्न मांडत नाहीत. बाहेर जाऊन बसतात आणि नौटंकी करतात, असे विधान भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले, तरी आपण माजी आमदार बच्चू कडू यांना नौटंकी म्हटले नाही, असे सांगून काल परवा जी दांडी यात्रा काढण्यात आली, त्यावर आपण बोललो, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या (Farmers) कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषण केले होते. त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे पालकमंत्री या नात्याने बावनकुळे यांना शिष्टाईसाठी पाठवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित केले होते.

पावसाळी अधिवेशनात ही समिती स्थापन करावी, अशी मागणी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली होती. याच दरम्यान त्यांनी पुन्हा पदयात्रेची घोषणा केली होती. यास बावनकुळे यांनी नौटंकी, असे संबोधले होते. कर्जमाफी संदर्भात तीन बैठका झाल्या. सविस्तर चर्चा झाली. या बैठकांना बच्चू कडू उपस्थित होते. त्यांच्यासोबत कोणाला आणि कुठल्या पद्धतीने कर्जमाफी द्यायची याबाबतही बोलले झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला होता.

यानंतरही त्यांनतर कडू यांनी आपले आंदोलन सुरच ठेवले. कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, तसेच आता चर्चा बंद आणि थेट मंत्रालयात घुसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांनी पुन्हा दांडी यात्रा काढून आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले आहे. याबाबत विचारणा केली असताना बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना वैयक्तिक नव्हे, तर त्यांच्या आंदोलनाचा आपण नौटंकी म्हटल्याचे सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातीलसुद्धा अनेक नेते हे ते नौटंकी करीत आहेत. ते सभागृहात प्रश्न मांडत नाहीत. मात्र बाहेर जाऊन बसतात. बच्चू कडू यांनी सांगितलेल्या बैठका आम्ही घेतल्या. गरीब माणसाचे कर्ज माफ झाले पाहिजे, त्यासाठी कमिटी तयार केली आहे. आठ दिवसानंतर बैठक घेणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या मतदारसंघात मते मिळवण्यासाठी मुद्दामच वक्तव्य करत असतात. ते काहीही बोलले तरी निवडून येणार नाहीत. हिंदू समाजाच्या भावना भडकवण्याचा काम जितेंद्र आव्हाड यांनी करू नये. अशा पद्धतीचे आरोप सनातन धर्म खपवून घेणार नाही असाही इशार बावनकुळे यांनी दिला.

संजय राऊत यांना खूप सिरीयस घ्यायची गरज नाही. त्यांच्याकडे हिंसाचार करणारी टीम नाही आहे.हिंसाचार केल्यास सरकार चूप बसणार नाही. कोणालाही सोडणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कोणात किती धमक आहे, ते आम्ही बघू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT