Jalna BLO Negligence Sarkarnama
विदर्भ

BLO FIR: SIRच्या कामातील BLOवर गुन्हे दाखल; आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई

FIR on BLOs in Nagpur: मतदारनोंदणीची कामगिरी सोपवलेल्या ब्लॉक लेव्हल ऑफिसर अर्थात बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे. नागपूरमध्ये नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

Amit Ujagare

FIR on BLOs in Nagpur: नागपूरमध्ये अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांवर शासनानं मतदार याद्या पुनर्रिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत महत्वाची जबाबदारी सोपवली होती. पण ही जबाबदारी या कर्मचाऱ्यांना चोख पद्धतीनं पार पाडली नाही. निवडणूक आयोगाचे आणि शासनाचे आदेश असतानाही या बीएलओनी एकाही मतदाराच्या घरी जाऊन माहिती घेतली नाही. त्यामुळं नोंदणीच्या या कामात ठरवून दिलेल्या वेळेचा अपव्यव झाल्याचं यंत्रणांच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळं अशा प्रकारे कामामध्ये दुर्लक्ष केल्याप्रकरणी नागपूरमधील ११ अंगणवाडी सेविकांवर नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल करण्यात आलेले हे बीएलओ हिंगणा आणि कामोठे विधानसभा मतदारसंघातील कामासाठी नेमण्यात आले होते. एसआयआरचं काम हे अत्यंत महत्वाचं असून ते वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाच्या खांद्यावर आहे. त्यामुळं नेहमीप्रमाणं निवडणूक आयोगाच्या कामासाठी शिक्षकवर्ग आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. पण यंदा एसआयआरचं काम आणि जनगणनेचं काम अशी दोन्ही कामं एकाच वेळी सुरु असल्यानं अनेक शिक्षकांसाठी हे खूपच जिकरीचं झालं आहे.

या दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्यानं अनेक शिक्षकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. शाळेतील शिकवणी वर्गांचं मुख्य काम सुरु असतानाच हा अतिरिक्त भार शासनानं टाकल्यानं ही काम पूर्ण करताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एसआयआरच्या या कामाच्या धावपळीत अनेक महिला बीएलओंचे अर्थात शिक्षिकांच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. आपल्या दुचाकीवरुन जात असताना अपघात होऊन जखमी झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्याचबरोबर अनेकांना हा त्रास सहन न झाल्यानं त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं किंवा हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT