

Operation HardBall: सेलिब्रेटी आणि बड्या उद्योगपतींना जीवे मारण्याचे प्रयत्न करणाऱ्या बिश्नोई गँगची दहशत कायमची संपवण्यासाठी या गँगच्या सदस्यांचा आता खात्मा करण्याच्या हालचाली सरकारनं सुरु केल्या आहेत. यासाठी ऑपरेशन हॉर्डबॉल लॉन्च करण्यात आलं आहे, विशेष म्हणजे यामध्ये अमेरिकेचा महत्वाचा सहभाग असणार आहे.
ऑपरेशन हार्डबॉल तयारी दरम्यान अमेरिकनं तपास अधिकाऱ्यांनी भारतातील अनेक केंद्रीय एजन्सीजसोबत बैठका केल्या होत्या. या बैठकांमध्ये बिश्नोई गँगमधील लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार, रोहित गोदारा, जगगू भगवानपुरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्याबाबत माहिती शेअर करण्यात आली तसंच त्याची पडताळणी देखील केली. द इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय एजन्सीजनं विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून अमेरिका आणि अन्य देशांमध्ये सक्रीय गँगस्टर्सची यादी आणि पुरावे देखील शेअर केले. अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या तपास एजन्सीजद्वारे संयुक्त करवाईपूर्वी गेल्या दीड महिन्यात या बैठकांना वेग आला आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेसोबत गँगस्टर अनमोल बिश्नोई यांच्यावर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत भारताच्या केंद्रीय एजन्सीजनं अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार याच्या सहकाऱ्यांची एक यादी शेअर केली आणि त्याची पडताळणी केली. त्यानंतर त्यांच्या लपण्याच्या संभाव्य जागांचा तपशील देखील दिला.
सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना भारतात अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांपैकी अनेकांनी लॉरेन्स बिश्नोई, त्यांचे सहकारी आणि विदेशांमध्ये त्यांच्या कारवायांची माहिती दिली. त्यांचे खुलासे आणि तांत्रिक निगरानीच्या आधारे त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यात आले.
ऑपरेशन हार्डबॉल काय आहे?
ऑपरेशन हार्डबॉल अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या एजन्सीजद्वारे चालवला जाणारी एक संयुक्त मोहिम आहे. याचा उद्देश सीमेपलिकडून चालणाऱ्या संघटित गुन्हेगारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करणं आहे. तपासादरम्यान कॅलिफोर्निया, ब्रिटिश कोलंबिया आणि इतर ठिकाणांवर डझनभर छापेमारी केली. या दरम्यान एजन्सीजनं सुमारे १००० किलो कोकेन, एक किलो हेरॉईन, एक डझनहून अधिक हत्यारं आणि मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त केली होती.
या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, इंडियाना आणि जॉर्जियामध्ये अनेकांना अटक झाली. तर कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी तीन लोकांना अमेरिकत प्रत्यार्पणासाठी ताब्यात घेतलं. स्पेनमध्ये एका आरोपीला अटक केली होती. तर १० आरोपींना अद्यापही फरार घोषीत करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.