Nagpur ACB trap Sakarnama
विदर्भ

Nagpur ACB trap : नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचखोरीची कीड; पाच लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यक जाळ्यात

ACB traps Nagpur Collector Office revenue assistant Naresh Barve while accepting ₹5 lakh bribe; anti-corruption crackdown intensifies : नागरपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकाला पाच लाख रूपयांची लाच प्रकरणी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Nagpur Collector Office corruption : बांधकामाशी संबंधित अपील प्रकरण निकाली काढण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश साधूरावजी बर्वे (वय 54) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.

ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा नागपूर शहरातील नंदनवन परिसरात करण्यात आली. या कारवाईमुळे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचखोरीवर खमंग चर्चा रंगल्या आहेत.

तक्रारदाराच्या शिवाजीनगर, महाल इथल्या नझुल प्लॉटवरील बांधकामासंदर्भातील अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित होते. ते निकाली काढण्यासाठी बर्वे याने पाच लाख रुपयांची मागणी केली होती. थेट पाच लाख रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदार काहीसा भांबवला. यानंतर त्याने थेट लाचलुचपत (corruption) प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर (Nagpur) पथकाने 17 व 20 एप्रिलला पडताळणी केली. यात आरोपी लाच मागत असल्याचे दिसून आले. यानंतर पथकाने सापळा रचला. त्यानुसार शुक्रवारी (ता. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास तक्रारदाराकडून पंचासमक्ष बर्वे याने पाच लाखांची रक्कम स्वीकारताच पथकाने पकडले.

अंगझडतीत 5 लाख रुपये जप्त करण्यात आले. त्यामध्ये काही बनावट नोटांचाही समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विवेक पडघान तपास करीत आहेत.

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अलीकडच्या काळात सर्वाधिक लाचेच प्रकरण यानिमित्ताने समोर आलं आहे. याशिवाय एवढ्या मोठ्या रकमेच्या लाचमुळे, लाचखोरीच्या वेगवेगळ्या कथांवर खमंग चर्चा रंगली आहे. एवढ्या मोठ्या लाचेच्या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी प्रशासकीय पातळीवर कोणत्या उपाययोजना करतील, याकडे देखील लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT