Nagpur Collector Vipin Itankar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Collector and Voting Percent : लोकसभेवेळी मतदानाचा टक्का घसरल्याने विधानसभेसाठी नागपूरचे जिल्हाधिकारी 'मिशन मोड'वर!

राजेश चोरपे

Nagpur Vidhansabha Election Voting: लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा घसरल्याने पुढाऱ्यांसह सर्वांचाच रोष ओढावून घेणारे नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर विधानसभेच्या निवडणुकीसाठी चांगलेच दक्ष झाले आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दोनशेपक्षा जास्त फ्लॅट असलेल्या इमारती, तसेच 900पेक्षा अधिक मतदार असलेल्या संकुलातच मतदान केंद्राची सुविधा ते उपलब्ध करून देणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा अधिकाधिक मतदानाचे आवाहन जनतेला केले होते. प्रत्यक्षात 54 टक्केच मतदान झाले.

त्यानंतर नागपूरमध्ये मुक्कामी असताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारणा केली होती. प्रचंड ऊन होते असे सांगून भाजपच्या कार्यकर्त्यांनी यातून आपली सुटका करून घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे.

तर मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांमधील घोळही समोर आला होता. हजारो मतदार याद्यांमधील नावे गहाळ होती. अनेकांच्या नावासमोर ‘डिलिट' असा ठप्पा मारण्यात आला होता. काही मतदारांचे केंद्र बदलण्यात आले होते. याचा चांगलाच फटका भाजपला बसला आहे. भाजपच्याच अनेक नातेवाईकांची नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाली होती. त्यामुळे मतदान यंत्रणेवर प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला होता.

मतदानाच्या दिवशी अनेकांनी जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप केले होते. आमदार कृष्णा खोपडे यांनी मतदारांना यादीतून कोणी गहाळ केले याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे अडचणीच आलेले जिल्हाधिकारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच खबरदारी घेणे सुरू केले आहे.

अलीकडेच भाजपने(BJP) 1 लाख 94 हजार 836 मतदरांची नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाली असल्याची यादीच जिल्हाधिकारी यांना सादर केली आहे. ज्या निवासी संकुलात, उंच इमारती, अपार्टमेंटमध्ये 200 पेक्षा अधिक फ्लॅटस आहेत, तसेच 900 च्यावर मतदारांची संख्या आहे, अशा ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मतदानासाठी मतदाराला जावे लागू नये असेही प्रयत्न सुरू आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT