BJP News : उमरेडमध्ये पुन्हा पारवे विरुद्ध पारवे? बड्या नेत्यांच्या भेटीगाठी

Shivsena Politics News : उमरेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे हे सध्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघावरचा आपला दावा भक्कम करीत आहेत.
Sudhir Parwe, Raju Parwe
Sudhir Parwe, Raju ParweSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच जण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमरेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे हे सध्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघावरचा आपला दावा भक्कम करीत आहेत.

मंगळवारीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील नेत्यांना आपला वट कुठपर्यंत आहे हे दाखवून दिले. सध्या या मतदारसंघावर काँग्रेसमधून (Congress) शिवसेनेत आलेले राजू पारवे दावा सांगत असल्याने येथे पारवे विरुद्ध पारवे असा संघर्ष सुरू आहे.

सुधीर पारवे उमरेडमधून दोन वेळा निवडून आले होते. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या राजू पारवे यांनी त्यांना पराभूत केले होते. पारवे भाजपमध्ये येण्यास वर्षभरापासून इच्छुक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत रामटेक मतदारसंघात त्यांच्या नावाला भाजपने पसंती दर्शवली होती.

रामटेक आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक सोडण्यास नकार दिला. शेवटी पारवे यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्यात आली.

रामटेकमध्ये पराभव झाल्याने पारवे खासदार होऊ शकले नाहीत. निवडणूक लढण्यासाठी पारवे यांनी दिलेला राजीनामा तत्काळ स्वीकारण्यात आला. त्यामुळे ते सध्या उमरेडचे माजी आमदार झाले आहेत.

काँग्रेसची दारे आता त्यांच्यासाठी बंद झाली आहेत. उमरेड मतदारसंघ भाजप (Bjp) सोडण्याची कुठलीही शक्यता सध्या नाही. दुसरीकडे शिवसैनिक त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. माजी खासदार कृपाल तुमाने यांना विधान परिषद दिल्याने शिवसेना आता पारवे यांच्या पुनर्वसनासाठी काही करेल याची शक्यता नाही. हे बघता राजू पारवे यांच्यासाठी भाजप हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. मात्र, उमरेडवर सुधीर पारवे यांचा दावा भक्कम आहे.

Sudhir Parwe, Raju Parwe
Ashok Chavan : मराठा आरक्षण बैठकीत अशोक चव्हाणांनी जरांगेंच्या भेटीतील मुद्यांवर दिला जोर...

भाजपने मागील विधानसभा निवडणुकीत अनेक धाडसी निर्णय घेतले होते. ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. याचा फटका विदर्भातील अनेक मतदारसंघात भाजपला बसला होता. बावनकुळे यांच्या कामठीला लागूनच उमरेड विधानसभा मतदारसंघ आहे.

सुधीर पारवे यांनी 72 हजार मते घेतील होती. थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांना पराभूत करणारेच आमदार भाजपात येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर पारवे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन आपला दावा भक्कम केला असल्याचे बोलले जात आहे.

या भेटीबाबत सुधीर पारवे म्हणाले, भाजपचे नेते म्हणून आपण त्यांना भेटलो. भेटीमागे उमेदवारी आणि निवडणुकीचा काही संबंध नाही. आपल्या मतदारसंघातील आंभोरा येथील पुल आणि चैतन्यश्वर मंदिराच्या दर्शनाला येण्याची विनंती केली आहे. ती त्यांनी मान्य केली. मोठ्या नेत्यांना भेटून भाजपमध्ये उमेदवारी मिळत नसते. विजयाच्या शक्यतेसह सर्वच बाबी तपासल्या जातात. त्यासाठी सर्वे केला जातो.

Sudhir Parwe, Raju Parwe
Vijay Wadettiwar News : आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, आम्ही निर्णय घेऊ; वडेट्टीवारांच सरकारला आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com