Nagpur Congress Corporator Attacked News : नागपूर शहरात २६ ऑगस्टच्या मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. काँग्रेस नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. ज्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ जणांना अटक केली असून, चार आरोपी फरार आहेत. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील तपासादरम्यान मुख्य सूत्रधाराची माहिती मिळाली असून, त्याच्यावर ४६ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
नागपूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ चे काँग्रेस नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे यांच्या घरावर २६ ऑगस्टच्या मध्यरात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. ही घटना वाठोडा परिसरातील श्रावणनगर येथील स्वामीनारायण मंदिराच्या मागे घडली होती. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र, गोळी लागल्याने घराची काच फुटली होती.
दरम्यान, नागपूर पोलिसांनी या गोळीबार प्रकरणात कारवाई करत ७ जणांना अटक केली आहे. तर ४ आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर तपासादरम्यान या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधारावर वेगवेगळ्या गुन्ह्यांत ४६ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
तर या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून, ७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर जे ४ आरोपी फरार आहेत, त्यांना देखील लवकरच अटक केली जाईल, असा दावा पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी व्यक्त केला.
तसेच, या प्रकरणातील गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तयारी पोलिस करत आहेत. तर हा गोळीबार फक्त ५० हजार रुपयांसाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपीचा ड्रग प्रकरणात देखील संबंध असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे.
दरम्यान, परिसरात दहशत निर्माण करणे आणि पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली असून, घटनेमागचा खरा हेतू हा मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतरच उघड होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.