Crime News : रायगड हादरले! जेसीबीने धडक दिली, ब्रेकर डोक्यात घालत काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या

Congress Leader Murder Case : रायगड जिल्हा हादरला असून, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील थळे यांच्या बंधूची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील अलिबाग हादरले असून, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील थळे यांचे बंधू विजय थळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे पोकलेनच्या ब्रेकरचा यासाठी वापर करण्यात आला असून, संशयित दोघेही थळे यांचे नातेवाईक असल्याचे समजते.

अलिबाग तालुक्यातील मापगाव परिसरात एका खाणीमध्ये माती, दगडाचे खोदकामादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष सुनील थळे यांचे धाकटे बंधू विजय थळे (वय ५०) यांच्यावर पोकलेनच्या ब्रेकरने डोक्यात जोरदार प्रहार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली.

गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी निकेश दळवी आणि आशिष दळवी या दोघांना अटक केली असून, अवघ्या पाच तासांत पोलिसांनी आरोपींना पकडल्याने तपासाला वेग आला आहे.

Congress
Crime News : सांगलीत भाजपच्या सरपंचाचा कारनामा : बँक मॅनेजरच्या घरावर डल्ला, लाखोंचा मुद्देमाल केला साफ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मापगाव येथील टाकादेवी मंदिर परिसरातील एका खाणीत माती व दगडाचे खोदकाम सुरू होते. बहिरोळे येथील निकेश दळवी आणि आशिष दळवी यांच्याकडून सुरू असलेल्या या खोदकामाबाबत विजय थळे यांनी सुमारे आठ दिवसांपूर्वी विचारणा केली होती. विना परवानगी दगड-मातीचे खोदकाम करून त्याची विक्री करू नये, अशी भूमिका थळे यांनी घेतल्याने त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला होता.

बुधवारी (दि. २) सायंकाळी याच खाणीच्या ठिकाणी आरोपी निकेश आणि आशिष असे दोघेजण पोकलेनच्या मदतीने दगड फोडण्याचे काम करीत होते. विजय थळे त्याठिकाणी गेले असता, त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादादरम्यान पोकलेनच्या ब्रेकरने विजय थळे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी झालेल्या थळे यांना तातडीने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Congress
Crime News : मुंबईतील भाजपचा पदाधिकारी चोरीच्या प्रकरणात Wanted : शोधासाठी पोलिसांची स्पेशल टीम रवाना

घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या पाच तासांत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. या घटनेमुळे मापगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, खाणकामावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला कसा पोहोचला, हल्ला नेमका कोणत्या परिस्थितीत झाला आणि त्यामागे अन्य काही कारण होते का, याचा तपास अलिबाग पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासात घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com