

Sangli News : सामान्य जनतेने ज्यांच्या हाती गावाच्या विकासाची आणि सुरक्षेची धुरा सोपवली, तेच जर चोरी करू लागले तर विश्वास ठेवायचा कोणावर? मिरज तालुक्यातील अंकली येथील भाजपचे स्थानिक नेते आणि सरपंच राहुल अनिल पाटील (वय ३६) याने विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका बँक व्यवस्थापकाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारभारीच चोर निघाल्यामुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.
पाटील याला अटक केल्यानंतर त्याचा तत्काळ जामीनही मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची पोलखोल एलसीबीच्या पथकाने केली असून, स्वतःच तपास हाती घेतला आहे.
अधिक माहिती अशी की, विश्रामबाग येथील एसटी कॉलनीत अश्विन शिवकुमार पिल्ले यांचे घर आहे. पिल्ले हे एका राष्ट्रीयीकृत बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. १९ ऑगस्ट रोजी ते कुटुंबीयांसोबत बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या बंद घरातून तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. या प्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.
एलसीबी पथकाने तपास सुरू करताच काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. या चोरीत आरोपी भाजपचा स्थानिक नेता आणि सरपंच असल्याचे राहुल पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
एलसीबीचे सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने मुद्देमालही वसूल केला. त्याला अटक केली. वैद्यकीय कारणाने त्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. या घटनेला तीन दिवस झाले, मात्र याबाबतची माहिती माध्यमांना उशिरा देण्यात आली. एकूणच या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.