Vijay Wadettiwar On Girish Mahajan Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar On Girish Mahajan : बाबू धीरज रखो... वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांना सूचक इशारा

Vijay Wadettiwar Targets BJP Minister Girish Mahajan Over Honey Trap Issue in Jalgaon : भाजपमधील मंत्री गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपचा आरोप असलेल्या लोढासोबत अनेक नेत्यांचे फोटो शेअर केले आहे.

Rajesh Charpe

Maharashtra honey trap case : हनी ट्रॅपने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी 'ना हनी, ना ट्रॅप', असे सांगून हे वृत्त धुडकावून लावले आहे. असे असले तरी रोज नव्या बातम्या या संदर्भात धडकत आहेत. गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपचा आरोप असलेल्या लोढासोबत अनेक नेत्यांचे फोटो शेअर केले आहे.

भाजपच्या नेत्यांनी हिंमत असेल, तर सीडी ओपन करा, असे खुले चॅलेंज विरोधकांना केले आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाजन यांना उद्देशून ‘बाबू धीरज रखो, जरा सब ओपन हो जायेगा‘ असा इशारा दिला आहे.

काँग्रेसचे (Congress) विधिमंडळातील नेते विजज वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार हनी ट्रॅपमुळे पडल्याचा दावा यापूर्वीच केला आहे. ही सीडी तिकीट लावून दाखवावी लागेल, ती उघड झाली तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडेल असेही त्यांनी सूचित केले होते. नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचा दावा केला होता.

यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाला सुरवात झाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व शिळ्या भाकऱ्या असल्याचे सांगून वृत्त फेटाळून लावले आहे. संजय राऊत मात्र यावर ठाम आहेत. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लोढासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल केले आहे. हिंमत असेल तर पेन ड्राईव्ह दाखवा असे आव्हान वडेट्टीवारांना दिले आहे.

त्यावर वडेट्टीवार म्हणाले, त्यात कोण कोण आहे ते आम्ही दाखवू. सगळंच उघड होईल ‘बाबू धीरज रखो जरा, सब ओपन हो जायेगा‘ असेही ते म्हणाले. या ट्रॅपमध्ये काही नाशिकला तर काही जण पुण्यातील आहेत. या सरकारचा हा प्रताप उघड होणारच आहे. यात मोठे अधिकारी, आजी-माजी मंत्री, अनेक मोठे मासे ट्रॅप झाले आहेत.

लोढाने अनेकांकडून पैसे घेतले आहेत. किमान 200कोटी रुपये त्याने वसूल केले असल्याची माहिती आहे. तो कोणाचा कार्यकर्ता आहे, मी यावर बोलणार नाही. हे उघड लवकर होईल. झाकलेले चेहरे बाहेर येतील असाही दावा वडेट्टीवार यांनी केला. लोढावर गुन्हा दाखल झाला आहे. आणखी अनेक लोक आहेत. मोठे रॅकेट यात सक्रिय आहे. यात अडकलेला कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सुमारे 50 अधिकारी व लोकप्रतिनिधी यात अडकले असल्याचा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT