
Vinod Bhatts ATS officer news : मुंबईत पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाड्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 12 आरोपींना सोमवारी निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे याप्रकरणाशी निगडीत अनेक मुद्दे पुन्ह चर्चेत आले आहे.
या बॉम्बस्फोट मालिकांचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवादविरोधी पथकाचे सहाय्यक आयुक्त विनोद भट यांचे अपघाती मृत्यूप्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. याच प्रकरणात 2015मध्ये विशेष 'मकोका' न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या वाहिद शेख याने बळकट केले. सुटकेनंतर त्याने लिहिलेल्या ‘बेगुनाह कैदी’ या पुस्तकात विनोद भट यांच्यावर वरिष्ठांचा प्रचंड दबाव होता, असा उल्लेख होता. तो संदर्भ देखील पुन्हा चर्चेत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर 7/11 बॉम्बस्फोट मालिकेचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) तत्कालीन सहाय्यक आयुक्त विनोद भट यांचे अपघाती मृत्यू प्रकरण पुन्हा ताजे झाले आहे. 28 ऑगस्ट 2006 रोजी माटुंगा आणि दादर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर भट यांचा मृतदेह सापडला. रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला, असे तेव्हा एटीएसमधील वरिष्ठ सहकाऱ्यांनी सांगितले होते.
मात्र दादरच्या कीर्ती महाविद्यालयाशेजारी राहणारे आणि सरकारी वाहनाने घरी निघालेले भट टिळक पुलावर उतरले. ओळखपत्र वगळता वैयक्तिक साहित्य चालक पोलिसाकडे देत हे माझ्या पत्नीकडे दे, असे सांगून चालत पुढे निघाले. त्यावरून त्यांनी आत्महत्या केली, हे स्पष्ट झाले. मुंबई (Mumbai) पोलिस दलात प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या भट यांनी टोकाचे पाऊल का उचलले? यावरून तेव्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली.
7/11 प्रकरणात वरिष्ठांनी अवैध गोष्टी करण्यास प्रचंड दबाव आणला. त्या गोष्टी विनोद भट यांच्या तत्त्वात बसत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा एक प्रवाह तेव्हा होता. या प्रवाहाला 2015मध्ये 'विशेष मकोका' न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या वाहिद शेख याने बळकट केले. वाहिदने सुटकेनंतर लिहिलेल्या ‘बेगुनाह कैदी’ या पुस्तकात भट यांच्यावर वरिष्ठांचा प्रचंड दबाव होता, असे उल्लेख आहेत. विनोद भट आणि फाशीची शिक्षा झालेला आरोपी यांच्यातील संभाषणाचे दाखलेही दिले आहेत.
हे आरोप तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांनी झुगारले होते, असे अनेक आरोप आरोपींनी खटल्यादरम्यान 'विशेष मकोका' न्यायालयात केले होते. मात्र न्यायालयाने ते आधारहीन आरोप फेटाळून लावत आरोपींना शिक्षा ठोठावली. पण पुढं आरोपींचे काही दावे सोमवारी उच्च न्यायालयाने ग्राह्य धरले. आरोपींचा छळ करून त्यांनी (पोलिसांनी) हवा तसा कबुलीजबाब मिळवला, हा आरोप न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यामुळे भट यांच्या मृत्यूनंतर झालेले आरोपही खरेच होते का? याबाबत पोलिस दलात चर्चा सुरू आहे.
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरण खटल्याच्या निकालात उच्च न्यायालयाने, आरोपपत्रात समाविष्ट करण्यात येणारे जबाब किंवा कबुलीजबाब यामध्ये काॅपी-पेस्ट (नक्कल) करण्याची वृत्ती गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालपत्रात ही बाब अधोरेखित करताना, असे प्रकार धोकादायक आहे, असा इशाराही न्यायालयाने दिला.
साक्षीदारांचे जबाब किंवा आरोपींच्या कबुलीजबाबाचा एक मुसदा करून, तो सर्वच साक्षीदार किंवा आरोपींच्या नावे लिहिला जातो, म्हणजेच एकच मजकूर काॅपी करून तोच सगळीकडे पेस्ट करण्याच्या या प्रकारावर विविध न्यायालयांनी यापूर्वी अनेकदा भाष्य केले आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी एटीएसच्या या काॅपी पेस्ट प्रकाराच्या त्रुटीवर बोट ठेवलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.