chandrashekhar bawankule Devendra Fadanvis Nitin Gadkari sarkarnama
विदर्भ

Nagpur Graduate Election: नागपूर पदवीधरमध्ये पराभवाचा धक्का; गडकरी-फडणवीस स्वत: उतरणार मैदानात, 5 नोव्हेंबरला पदयात्रा, बावनकुळेंची माहिती

BJP Political News: एकीकडे भाजपच्या 'थिंकटँक'कडून नागपूर पदवीधर मतदारसंघामधील पराभवाचं आत्मपरीक्षण सुरू असतानाच आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख नेतेमंडळीच पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा होम टाऊन,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय अशा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.याठिकाणी सुरुवातीला भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये पिछाडी आणि आघाडी अशी चुरस पाहायला मिळाली.अखेर या लढतीत काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळेंवर दणदणीत विजय मिळवला.या पराभवामुळे भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळी चांगलेच दुखावल्याची चर्चा आहे. अशातच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठी घोषणा केली आहे.

एकीकडे भाजपच्या 'थिंकटँक'कडून नागपूर पदवीधर मतदारसंघामधील पराभवाचं आत्मपरीक्षण सुरू असतानाच आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख नेतेमंडळीच पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगल्याच जिव्हारी लागला आहे.याच पार्श्वभूमीवर विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी 5 नोव्हेंबर रोजी नागपुरात एका भव्य पदयात्रा आयोजन करण्यात आली आहे.

राज्याचे महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी(ता.1 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत नागपुरातील भव्य पदयात्रेसंदर्भातील माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आंदोलनाचं व पदयात्रेचं स्वत:नेतृत्व करणार आहेत.

भाजपकडून विरोधकांच्या निवडणूक आयोग, एसआयआर प्रक्रिया, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनं, नरेटिव्हला विरोध म्हणून देशव्यापी 'लोकशाही वाचवा – अराजकता हटवा'हे अभियान सुरू केलं आहे. या पदयात्रेची सुरुवात नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून सुरुवात तर संविधान चौक येथे मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहीर सभेनं समारोप होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

'लोकशाही वाचवा – अराजकता हटवा'या अभियानामागचा हेतू स्पष्ट करण्यात आला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR प्रक्रिया),पात्र नागरिकांचा मतदानाचा हक्क आणि संवैधानिक संस्थांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याबाबतचं प्रबोधन करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

तसेच या पदयात्रेत सुमारे 15 ते 20 हजार नागरिक,तरुण यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या पराभवापाठीमागच्या संघटनात्मक पातळीवर झालेल्या चुकांचं आत्मपरीक्षण केले जाणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT