Solapur Politic's : शरद पवारांच्या दौऱ्याकडे सोलापुरातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची पाठ; दोघांच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा

Sharad Pawar Solapur Drought Tour : शरद पवार यांनी सोलापूरच्या दुष्काळी भागाची पाहणी करत माढा तालुक्यातील तुळशी गावाला भेट दिली. या दौऱ्याला आमदार उत्तम जानकर आणि नारायण पाटील अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली.
Narayan Patil-Uttam Jankar-Sharad Pawar
Narayan Patil-Uttam Jankar-Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 01 November : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूरच्या दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते. त्यांनी आज माढा तालुक्यातील तुळशी गावात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्याला पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी दांडी मारली. या दोन आमदारांच्या गैरहजेरीबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज माढा तालुक्यातील वरवडे येथून दुष्काळी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. वरवडे येथून पवारांनी तुळशी येथे पिकांची, पाण्याअभावी जळू लागलेल्या फळबागांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी तुळशी गावाला थेट मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी दौऱ्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील व इतर नेते सहभागी झाले होते. मात्र पक्षाचे जिल्ह्यातील अन्य दोन आमदारांनी मात्र पवारांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

Narayan Patil-Uttam Jankar-Sharad Pawar
Sharad Pawar Drought Tour : पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या तुळशीसाठी शरद पवारांची थेट मदत; 50 लाखांचा धनादेश सुपूर्त....

करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी विधान परिषद निवडणुकीपासून पक्षाच्या भूमिकेशी विसंगम निर्णय घेतले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

तसेच, सध्या सुरू असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीतूनही पक्षीय धोरणाच्या विरोधात वागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सोलापूरमधील शरद पवार यांच्या दौऱ्यात हे दोन्ही नेते सहभागी होणार की नाही, याची उत्सुकता होती. पण, आमदार जानकर आणि नारायण पाटील यांनी पक्षाच्या अध्यक्षांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

Narayan Patil-Uttam Jankar-Sharad Pawar
Sangli Dcc Bank : सांगली DCC बॅंकेच्या मतदानादरम्यान जतमध्ये गोंधळ : दाखवून मतदान केले, फेरमतदानाची काँग्रेस नेत्यांची मागणी; पडळकारांनीही दिले उत्तर...

माढा तालक्यातील तुळशी गावासाठी शरद पवार यांनी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली. या रकमेचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तो धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.