Graduate Constituency election voting rules Maharashtra Sarkarnama
विदर्भ

Nagpur Graduate Constituency: पदवीधर निवडणुकीत जांभळ्या पेनाने मतदान; ३८ उमेदवार रिंगणात, बंडखोरांमुळे लढत रंगतदार

Nagpur Graduate Constituency election features 38 candidates across six districts: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात असून गुलाबी मतपत्रिकेवर निर्धारित जांभळ्या पेनाने पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. सहा जिल्ह्यांत ४५५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Graduate Constituency: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर 2026 रोजी होत असून, यासाठी निवडणूक ही पंसतीक्रमाने होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पसंतीक्रम नोंदवताना जांभळ्या रंगाच्या पेनचा वापर करण्यात येणार आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानानंतर मतमोजणीसाठी गुलाबी शाईच्या मतपत्रिकेवर विशिष्ट प्रकारच्या जांभळ्या रंगाच्या पेनाने पसंतीक्रम नोंदवला जाणार आहे.

या पेनाने मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर १, २, ३ किंवा 1, 2, 3 अथवा रोमन अंकांत I, II, III अशा पद्धतीने पसंतीक्रम लिहून मतदान करावे लागणार असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होणार असल्याने पहिल्या पसंतीसोबतच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मतांना मोठे महत्त्व प्राप्त झाले असून यासाठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी नागपूर विभागातून ३८ उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर त्यांच्या पक्षातील किंवा घटक पक्षातील बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पदवीधरांची ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

या मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात मुख्य लढत होत आहे. भाजपने त्यांचा हा पारंपारिक गड राखण्यासाठी मोठी ताकद लावली आहे.

३८ उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून मतदारांना मतदानासाठी विशिष्ट प्रकारच्या जांभळ्या रंगाचा पेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, तेथे पोहोचविण्यात येणाऱ्या मतदारांना मतपत्रिकेवर आपल्या आवडत्या उमेदवाराला पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या समावेश असलेल्या या मतदारसंघासाठी एकूण ४५५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेत मतदारांनी मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविताना निर्धारित पद्धतीचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT