Ambadas Danve : मराठवाडा पदवीरधरसाठी उमेदवार का दिला? अंबादास दानवेंनी केले स्पष्ट; राष्ट्रवादीवर केले गंभीर आरोप

Ambadas Danve alleges NCP SP changed its stance on the Marathwada Graduate: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ऐनवेळी उमेदवार दिल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने पुणे आणि कोल्हापूरमध्येही उमेदवार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Ambadas Danve
Ambadas Danve Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahavikas Aghadi : पदवीधरसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या उमेदवार माघारीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता मराठवाडा पदवीधरवरुन महाविकास आघाडीमध्येही बिघाडी असल्याचे चित्र आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार नाही, असे त्यांनी सांगीतले होते, म्हणून आम्ही बिनधास्त होतो. आठ-नऊ महिन्यापूर्वी आम्ही राहूल पाटील यांच्याशी बोलून प्रतापसिंह पाटलांना याबाबत विचारले होते. पैठणचे सचिन घायाळ ही आमच्याकडे आले होते.

राष्ट्रवादीने आम्ही शिक्षक मतदारसंघ लढवू असे सांगून ऐनवेळी मराठवाडा पदवीधरसाठी उमेदवार दिला, असा दावा दानवे यांनी केला. म्हणून आम्ही कोल्हापूर, पुण्यात त्यांच्याविरोधात उमेदवार दिले, काय व्हायचे ते होऊ द्या, असेही दानवे म्हणाले. यावरून मराठवाडा पदवीधरच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले.

ठाकरे व शरद पवारांचे दोन उमेदवार रिंगणात असल्यामुळे हा आघाडीच्या रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात होते. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेला गाफील ठेवत राष्ट्रवादीने डाॅ. प्रतापसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचा गौप्यस्फोट अंबादास दानवे यांनीच केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दानवे यांनी मराठवाडा पदवीधरच्या दोन उमेदवारांवर भाष्य केले.

Ambadas Danve
Kailas Patil : शेतकऱ्यांना पंचनामे अन् आश्वासनांच्या चक्रात अडकवू नका, ठाकरेंच्या आमदाराने केंद्राच्या पथकाला सुनावले

महाविकास आघाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि मराठवाडा पदवीधरची जागा आपल्याकडे होती. मराठवाडा पदवीधर मतदार संघातून आम्ही निवडणूक लढणार नाही, आम्ही शिक्षक मतदारसंघ लढू असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. आज शरद पवारांच्या पक्षाकडून जे आमच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत, त्या प्रतापसिंह पाटील यांना आम्ही विचारले होते, तेव्हा त्यांनी नकार दिला होता.

त्यामुळे आम्ही दिलीप घुगे यांना उमेदवारी दिली, याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला. आता निवडणूक ताकदीने लढवायची. प्रचाराला नऊ दिवस शिल्लक आहेत. प्रत्येकाने पक्षासाठी ९ दिवस दिले आणि पन्नास-शंभर मतदारांशी थेट संपर्क साधला तर चांगली मते आपण मिळवू शकतो, असेही दानवे म्हणाले.

Ambadas Danve
ShivSena UBT News: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, पक्षाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी

मुंबईत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीच्या आंदोलनात आदित्य ठाकरे आक्रमकपणे उतरले आहेत. त्याच आक्रमकपणे आपल्याला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक देखील लढवायची आहे, असे आवाहन अंबादास दानवे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com