Nagpur Graduate Constituency Sarkarnama
विदर्भ

Nagpur Graduate Constituency : मतमोजणी प्रक्रियेवर उमेदवारांचा आक्षेप : CCTV बंद, बॅलेट पेपर पाहण्यासही मज्जाव केल्याचा आरोप

Nagpur Graduate Constituency Vote Counting : अपक्ष उमेदवारांच्या दाव्यानुसार, मतमोजणी सभागृहात बॅलेट पेपरची पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, ही मागणी केल्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

Nagpur News, 27 Oct : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी आंदोलन केले. मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप करत या उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली. तसेच संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून मतमोजणी पारदर्शकपणे करण्याची मागणी केली.

अपक्ष उमेदवारांच्या दाव्यानुसार, मतमोजणी सभागृहात बॅलेट पेपरची पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, ही मागणी केल्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीची योग्य दखल घेतली नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

मतमोजणीच्या टेबलवर सर्व ३८ उमेदवारांसाठी आवश्यक असलेले डबे ठेवण्यात आले नव्हते, असाही आक्षेप आंदोलनकर्त्यांनी घेतला. काही मोजक्याच उमेदवारांसाठी डबे ठेवण्यात आले होते, तर इतर उमेदवारांसाठी अशी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान तीन दिवस काही काळ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकारांमुळे मतमोजणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे उमेदवारांनी म्हटले आहे.

संबंधित आरोपांची सखोल चौकशी करावी, सर्व उमेदवारांना समान संधी द्यावी आणि मतमोजणी प्रक्रियेतील अनियमिततेबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT