भाजपला मोठा राजकीय धक्का! माजी खासदाराची लेकीसह पक्षाला सोडचिठ्ठी, शेकडो कार्यकर्त्यांसह हाती धरला विरोधी पक्षाचा झेंडा!

Former MP quits BJP and joins opposition party : भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी खासदाराने मुलीसह पक्ष सोडत शेकडो कार्यकर्त्यांसोबत विरोधी पक्षात प्रवेश केला. जाणून घ्या सविस्तर बातमी.
भाजपला मोठा राजकीय धक्का! माजी खासदाराची लेकीसह पक्षाला सोडचिठ्ठी, शेकडो कार्यकर्त्यांसह हाती धरला विरोधी पक्षाचा झेंडा!
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

उत्तर प्रदेशातील 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी आपली मुलगी कीर्ती कश्यप आणि समर्थकांसह भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. लखनऊ येथील समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या घडामोडीमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

धर्मेंद्र कश्यप यांच्यासह तेज प्रताप सिंह, श्रावस्ती, रंजीत गिरी गोस्वामी, अमन साहू, डॉ. प्रमोद विश्वकर्मा आणि विलास बाबू वाल्मीकि यांच्यासह अन्य नेत्यांनीही समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशावेळी आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यातील राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

भाजपला मोठा राजकीय धक्का! माजी खासदाराची लेकीसह पक्षाला सोडचिठ्ठी, शेकडो कार्यकर्त्यांसह हाती धरला विरोधी पक्षाचा झेंडा!
Maharashtra Farmer Loan Waiver : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! आणखी 4.15 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय!

समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर धर्मेंद्र कश्यप यांनी भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली. तसेच, बरेली मंडळासह पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागांत कश्यप आणि निषाद समाजातील लोकांपर्यंत पोहोचून समाजवादी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवपाल यादव यांनी धर्मेंद्र कश्यप यांचे पक्षात स्वागत केले. कश्यप हे 2003 मध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि पक्षासाठी विश्वासाने काम करत आले आहेत, असे त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशात बदल घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपला मोठा राजकीय धक्का! माजी खासदाराची लेकीसह पक्षाला सोडचिठ्ठी, शेकडो कार्यकर्त्यांसह हाती धरला विरोधी पक्षाचा झेंडा!
सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे बंद! 'हे' 10 कागदपत्रे आता घरबसल्या मोबाईलवर मिळवा!

अखिलेश यादव यांनीही नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत करत त्यांच्या प्रवेशामुळे सामाजिक न्याय आणि PDA आघाडीच्या लढ्याला बळ मिळेल, असे सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या थकीत देयकांचा मुद्दा उपस्थित केला. समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास शेतकऱ्यांची 162 कोटी रुपयांची थकबाकी 24 तासांत अदा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com