Pune Graduate Result : विधानपरिषदेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच ठाकरेंच्या उमेदवाराने पराभव मान्य केला : मतदारांचे मानले आभार

Pune Graduate Constituency Result : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुनील जबरचंद मोदी निवडणुकीच्या रिंगणात होते.
Pune Graduate Election | Sunil Modi Accepts Defeat
Pune Graduate Election | Sunil Modi Accepts DefeatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Graduate Election Result : राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुनील जबरचंद मोदी यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात प्रमुख लढत होत आहे

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुनील जबरचंद मोदी निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीदरम्यान समोर येत असलेले कल पाहता आपला विजय होण्याची शक्यता कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर मोदी यांनी निकालापूर्वीच पराभव मान्य केला.

Pune Graduate Election | Sunil Modi Accepts Defeat
Karnataka SIR : काँग्रेसशासित राज्यातच SIR प्रक्रियेदरम्यान 1 कोटी मतदारांना वगळलं : अंतिम मतदार यादी जाहीर

सुनील मोदी यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, "पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नसली, तरी आतापर्यंतच्या मतमोजणीतील कल पाहता माझा पराभव मी नम्रपणे स्वीकारत आहे. मतदारांनी दिलेल्या कौलाचा मी मनापासून आदर करतो. या निवडणुकीत मला साथ, सहकार्य आणि प्रेम दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांसह सर्व नेते, पदाधिकारी, शिवसैनिक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

Pune Graduate Election | Sunil Modi Accepts Defeat
Pune Police : पुणे पोलिसांनी विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं : लक्ष्मण हाकेंच्या संरक्षणाबाबतही मोठा निर्णय

निवडणुकीतील जय-पराजय हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. आपण सर्वांनी घेतलेले कष्ट, दाखवलेला विश्वास आणि दिलेले प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. जनसेवेचा माझा प्रवास यापुढेही असाच सुरू राहील," असं म्हणत सुनील मोदी यांनी अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com