Anil Sole Nagpur Graduate Constituency sarkarnama
विदर्भ

Anil Sole: माजी आमदार अनिल सोले भाजपला दगा देणार की मानणार? : नागपूर पदवीधरची रंगत वाढली

Nagpur Graduate Election: नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. भाजपकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून माघारीच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Graduate Election: नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे नेते प्रा. अनिल सोले यांची समजूत काढण्यासाठी पक्षाच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारपर्यंत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (ता. ५) सोले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी दोघांत चर्चा होऊ शकली नाही.

बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखण्यासोबतच सोले यांच्याशी संवाद साधण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

गडकरी यांनी स्वतः अनिल सोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संवाद होऊ शकला नाही. अर्ज माघारीची वेळ संपण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने सकारात्मक मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कराळेंच्या उमेदवारीचा फटका नाही : विकास ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नीतेश कराळे यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. याविषयी काँग्रेस आमदार विकास ठाकरे म्हणाले, या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या मतांवर कोणताही परिणाम होणार नाही. गेल्या निवडणुकीतही कराळे रिंगणात होते, तरीही वंजारी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT