Gokul Election 2026: गोकुळसाठी सतेज पाटलांचं ‘पॅनेल’ तयार; ७ विद्यमानांना पुन्हा संधी, १८ नवे चेहरे मैदानात

Satej Patil’s panel for the Gokul Election 2026: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने पॅनेल जाहीर केले. सात विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देत १८ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे.
Satej Patil’s panel for the Gokul Election 2026
Satej Patil’s panel for the Gokul Election 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. पॅनेलमध्ये सात विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली असून तब्बल १८ नवीन चेहऱ्यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

गोकुळच्या २५ संचालक पदांसाठी १८ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची अंतिम मांडणी झाल्यानंतर आता प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

उमेदवारांची घोषणा करताना सतेज पाटील म्हणाले, “दूध उत्पादकांना आमच्यावर विश्वास आहे. ठरावधारक आम्हाला विजयी करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गोकुळ निवडणुकीवरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या हालचालींवरही त्यांनी निशाणा साधला. महायुतीमध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती असून “गोकुळला चार दारे करू नयेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

Satej Patil’s panel for the Gokul Election 2026
Someshwar Sugar Factory : सोमेश्वरमध्ये एकत्र येण्याच्या बैठकीत नेमकं काय 'डील' झाली? जय पवारांनी सांगितली Inside Story ; जगतापांवरही थेट निशाणा...

‘समविचारी आघाडी’च्या पॅनेलमध्ये कोण?

सर्वसाधारण गट :

शशिकांत पाटील चुयेकर (माजी संचालक), बाबासो चौगले, अभिजित तायशेटे, किसन चौगले, राहुल देसाई, बाबासाहेब विष्णू देवकर, उदय पाटील, उदयसिंह जाधव, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, सत्यजित पाटील, रणधीर मोरे, विश्वजित पाटील, भीमगोंडा बोरगावे, विशाल पाटील, विश्वास इंगवले, दादसो सातार्डेकर, विकास पांडुरंग पाटील, सुभाष भोसले आणि शहाजी पाटील.

महिला राखीव :

अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे.

इतर मागासवर्गीय :

शशिकांत खोत.

अनुसूचित जाती-जमाती :

राजू आवळे.

भटक्या-विमुक्त :

बयाजी शेळके.

Satej Patil’s panel for the Gokul Election 2026
Pune MPSC Protest: रस्त्यावर उतरलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांना ‘मैदान’ दाखवणार? पुण्यातील सत्ताधाऱ्यांची मोठी खेळी.. हा ठराव मंजुर

सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल

गोकुळचे दूध संकलन 18 लाख लिटर होते. पण प्रशासक काळात हेच दूध 14 लाख लिटर इतक्यावर आले. पण हेच दूध संकलनाचे आमचे ध्येय 30 लाख लिटर करू असा विश्वास आमदार सतेज पाटलांनी यांनी व्यक्त केला.

महायुतीसमोर आव्हान?

एका बाजूला सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीने २५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतही राष्ट्रवादी काँग्रेसला ९, भाजपला ७ आणि शिवसेनेला ७ जागा देण्याचे जागावाटप निश्चित होऊन उमेदवारांचीही घोषणा झाली आहे. यात चार विद्यमान संचालकांना दणका देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com