नागपूर विभागातील आयाडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे याला चार महिने फरार राहिल्यानंतर अटक करण्यात आली.
उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
आरोपी सतीश मेंढे याचाही जामीन फेटाळण्यात आला असून तो माजी खासदार सुनील मेंढे यांचा भाऊ आहे.
Nagpur News : नागपूर विभागातील शालार्थ आयाडी घोटाळ्यातील मोठी बातमी समोर आली आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भविष्य निर्वाह निधी पथकाचा अधीक्षक नीलेश वाघमारे याला त्याच्या अटक करण्यात आली आहे. तो चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. या घोटाळ्यातील आणखी एक आरोपी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांचाही जामीन फेटाळण्यात आला आहे.
नागपूर विभागात 2019 ते २०25 या दरम्यान अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून त्याद्वारे सरकारचे कोट्यवधीचे नुकसान केल्याचे उघड झाले होते. तर हा घोटाळा उल्हास नरड यांच्या नेतृत्वात सात सदस्यीय चौकशी समितीने उघडकीस आणला होता. या प्रकरणात 12 मार्चला विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील सायबर पोलिसांना तक्रार दिली होती. या तक्रारीत 233 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार केल्याची बाब नमूद केली होती. या प्रकरणात नीलेश वाघमारे वेतन अधीक्षक असल्याने त्याच्याविरोधात सायबर पोलिसांनी तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच, नीलेश वाघमारे फरार झाले होते.
दरम्यान तक्रारीच्या तिसऱ्या दिवशीच उपसंचालक उल्हास नरड आणि शिक्षक पराग पुडकेला अटक झाली. काही दिवसांनी नीलेश वाघमारेला निलंबित करण्यात आले. दोन महिन्यानंतर चौकशीसाठी पोलिसांकडून एसआयटी तयार करण्यात आली. एसआयटीकडून या प्रकरणात जवळपास 25 आरोपींना अटक झाली.
मात्र मुख्य सुत्रधार नीलेश वाघमारे फरार होता. यादरम्यान त्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ते उच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तिन्ही न्यायालयांकडून त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान गुरुवारी दुपारी तो धरमपेठेतील एका ठिकाणी असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांच्या पथकाने त्याला अटक केली. या अटकेने शिक्षण संस्थांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी वाघमारेला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता त्याची 19 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या अटकेने शिक्षण संस्थांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
असा झाला भ्रष्टाचार
शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आदेशानंतर कार्यालयाद्वारे शालार्थ आवडीसाठी कर्मचाऱ्याचे नाव, जन्म दिनांक, वर्ग, संवर्ग, पदाची माहिती भरून तो ड्राफ्ट शाळेच्या लॉगिन आयडीवर पाठविला जातो. तो ड्राफ्ट परिपूर्ण भरून वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षकाकडे पाठविण्यात येतो. मात्र, असा कुठलाही प्रकार न होता, थेट ऑनलाइन ड्राफ्टच्या माध्यमातून वेतन करण्यात आले आल्याची माहिती समोर आली. या चौकशीत कुठलाही आदेश नसताना, आयडी आणि पासवर्डचा दुरुपयोग करून नियुक्त केलेल्या शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन ड्राफ्टच्या माध्यमातून वेतन करण्यात आल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
प्र. 1: नीलेश वाघमारे कोण आहे?
उ. 1: नीलेश वाघमारे हा नागपूर विभागातील आयाडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असून तो भविष्य निर्वाह निधी पथकाचा अधीक्षक होता.
प्र. 2: तो किती दिवस फरार होता?
उ. 2: तो चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता.
प्र. 3: आणखी कोणाचा जामीन फेटाळला गेला?
उ. 3: माजी खासदार सुनील मेंढे यांचा भाऊ व सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांचा जामीन फेटाळला गेला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.