Nagpur MLC: नागपूरची स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक सध्या भलतीच चर्चेत आली आहे. भाजपच्या रिसॉर्ट पॉलिटिक्समुळं त्याला वेगळाच रंग चढला आहे. कारण नागपूर शहर अन् जिल्हा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव असलेला भाग आहे. शहरातला कामठी हा मतदारसंघ चंद्रशेखर बावनकुळे यांचा तो बालेकिल्ला आहे. त्याचबरोबर भाजपकडं या निवडणुकीसाठी बहुमतही आहे. पण तरीही भाजपनं आपले सर्वच्या सर्व नगरसेवक हे गोव्याला पर्यटनासाठी पाठवले आहेत. त्यामुळं एका विशिष्ट भीतीमुळं भाजपनं केलेल्या या कर्तव्याची सर्वाधिक चर्चा आहे.
खरंतर नागपूर महापालिकेचा सध्या पर्यावरण संवर्धन पंधरवडा सुरु आहे. ५ जून ते २१ जून असा हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाची चर्चाही शहरात सुरु आहे. पण त्यातच भाजपचे नगरसेवकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याऐवजी थेट गोव्याला जाणं भाग पडलं आहे. यामागे खरंतर विधानपरिषदेची निवडणूक हेच कारणं आहे. या निवडणुकीत भाजपकडं बहुमत आहे, पण तरीही विरोधी उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे.
बुधवारी १० जून रोजी नागपूर महापालिकेतील भाजपचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे रेल्वेनं मुंबईला रवाना झाले आहेत, त्यानंतर तिथून ते गोव्यालाही जाणार आहेत. १० ते १७ जून पर्यंत त्यांचा हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामध्ये सुरुवातीला मुंबईत दोन दिवस या नगरसेवकांनी भाजपकडून प्रशिक्षण शिबीर होणार आहे, त्यानंतर पुढचे चार दिवस हे नगरसेवक गोव्याला सहलीचा आनंद लुटणार आहेत. १७ तारखेला हे सर्वजण परत नागपूरकडे रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे नागपुरात दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करायचं आहे. म्हणजेच मतदानाच्या दिवसापर्यंत या नगरसेवकांना काँग्रेसकडून कुठलंही आमिष दाखवून क्रॉस वोटिंग घडवून आणलं जाऊ शकतं याची भाजपला भीती असल्यानंचं हा गोव्याचा प्लॅन आखण्यात आला आहे.
दरम्यान, १८ तारखेला विधानपरिषदेसाठीचं एकदा मतदान पार पडलं की मग भाजपं निश्चित होणार असून त्यानंतर नागपूर महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन पंधरवड्यांतर्गत पर्यावरण रक्षणासाठीच्या विविध उपक्रमांमध्ये ते सहभाग नोंदवणार आहेत, अशी माहिती सुत्रांकडून कळते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.