

Shatrughna Sinha: तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी केलेल्या बंडामध्ये सायोनी घोष, युसुफ पठाण आणि शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काल हिंदीतल्या माध्यमांनी बंडखोर खासदारांची यादीच जाहीर केल्यानंतर यांपैकी एक असलेल्या खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मोठी घोषणा केली आहे.
अभिनेता ते राजकीय नेता बनलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी बंडखोरांच्या यादीत आपलं नाव आलं याचा इन्कार केला आहे. आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची साथ कधीही सोडणार नाही, असं जाहीर केलं आहे. जेव्हा माझ्या जीवनाचा कठीण काळ सुरु होता तेव्हा ममता बॅनर्जी या आपल्यासोबत मजबुतीनं उभ्या होत्या. तृणमूलच्या खासदारांनी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याप्रती आपली निष्ठा प्रकट करताना आता माझं कर्तव्य आहे की मी देखील आता पक्ष आणि नेतत्वासोबत उभं राहावं, असं म्हटलं आहे, ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
ममता बॅनर्जी झुंजार नेत्या
सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि तृणमूल काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या आव्हानांदरम्यान सिन्हा यांनी हे स्पष्ट केलं की, आपण कुठल्याही बंडखोर गटाचा भाग बनणार नाही. मी त्यांचा आभारी आहे ज्यांनी मला तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटात समाविष्ट होण्यासाठी मला निमंत्रित केलं. पण माझी सैद्धांतिक भूमिका अशी आहे की, मला याविषयी ममता बॅनर्जी यांच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे.
खासदार सिन्हा यांनी पुढे असंही म्हटलं की, निवडणूक निकालांच्या आधारे ममता बॅनर्जी यांची राजकीय ताकद कमी झाल्याचं सांगत त्यांचं मुल्यमापन होऊ शकत नाही. ममता बॅनर्जी एक झुंझार नेत्या असून आताही त्यांना ४१ टक्के मत मिळाली आहेत. हे हेच दाखवत की, राज्यात त्यांचा जनाधार पूर्णपणे संपलेला नाही.
स्वर्थ्यासाठी आपला रस्ता बदणार नसल्याचंही शत्रुघन् सिन्हा यांनी म्हटलं आहे, राजकारण हा केवळ सत्तेचा खेळ नाही. तर ज्या लोकांनी कठीण काळात ममता बॅनर्जींना साथ दिली, त्यांच्याप्रती प्रामाणिक राहणं त्यांची राजकीय आणि व्यक्तिगत प्रतिबद्धचा भाग आहे.
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हांचं हे विधान आजच्या काळात महत्वाचं यासाठी आहे की, जेव्हा पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसचं भविष्य आणि पक्षांतर्गत संभाव्य पुर्नस्थापनेच्या निमित्तानं चर्चेत आहे. त्यांच्या विधानातून हाच संदेश दिला जातोय की, पक्षाचे काही वरिष्ठ नेते आताही ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावर भरवसा आहे. त्यामुळंच पक्षाला मजबूत करण्यासाठीच मी पक्षात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.