BJP leaders celebrate after the Nagpur Municipal Corporation election results, where the party secured 102 seats, maintaining power as Congress and other parties faced mixed outcomes. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Mahapalika : भाजपची सेंच्युरी... पण CM फडणवीसांना त्यांचाच रेकॉर्ड मोडता आला नाही! काँग्रेसचे 100+ मिशनही फसले

Nagpur Municipal Corporation Results : महापालिका निवडणुकीत भाजप 102 जागांसह सत्तेत, काँग्रेसचे मिशन 100 अपयशी, एमआयएमची एंट्री, बदलते शहरी राजकारण आणि आगामी स्थानिक सत्तासमीकरणांचे संकेत दिसून आलेले निकाल राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे स्पष्ट संदेश

Rajesh Charpe

Nagpur MahaPalika News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. नागपूर महापालिकेत सर्वाधिक 102 जागा जिंकून भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही आमचा विक्रम मोडू असा दावा मतदानाच्या दिवशी केली होता. मात्र भाजपला आपल्याच विक्रमाची बरोबरी साधता आली नाही. मागील निवडणुकीत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी त्यांच्या 6 जागा कमी झाल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसने 100 नगरसेवकांचे टार्गेट ठेवले होते. त्यांना अर्धशतकही गाठता आलेले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असल्याने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपने 56 माजी नगरसेवकांच्या तिकिट कापले होते. अनेक ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळून आला होता. सर्वाधिक बंडखोरी भाजपातच झाली होती. याशिवाय मतदार याद्यांमधील घोळाचा फटका भाजपला बसेल असे दावे कले जात होते.

15 वर्षांपासून महापालिकेत भाजपचाच झेंडा फडकत होता. ॲंटी इन्कंबंसी आणि काही निष्क्रिय नगरसेवकांवर असलेला नागरिकांचा रोषाने भाजपला शंभरी गाठणे अवघड ठरेल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र भाजपने या सर्वावर मात करीत पुन्हा एक नागपूर महापालिका आपल्या ताब्यात घेतली. काँग्रेसची कामगिरी पूर्वीपेक्षा सुधारली असल्याचे दिसून आले. मागील निवडणुकीत काँग्रेसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी यात 4 नगरसेवकांची भर पडली आहे.

काँग्रेसचे 33 नगरसेवक निवडून आले आहेत. यावेळी सर्वाधिक फटका तो बसपाला बसला. एमआयएम आणि मुस्लिम लिगने अनपेक्षित मुसंडी मारून बसपाच्या हत्तीला पुरते लोळवले. महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून एमआयएमने (AIMIM) नागपूर शहरात आपले खाते उघडले. त्यांचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मुस्लिम लिगचे 4 नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षाचा जबर फटका बसपासह काँग्रेसला बसला आहे. बसपाचे 10 नगरसेवक होते. त्यांची संख्या यावेळी एकवर आली आहे.

उद्धव ठाकरे सेनेने आपले दोन तर राष्ट्रवादीने एक नगरसेवकाची संख्या कायम ठेवली. शरद पवार यांच्या सेनेला भोपळा फोडता आला नाही. या निवडणुकीने शिंदे सेनेलाही शहरात खाते उघडता आले. त्यांचा एकच नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे (BJP) प्रभाग क्रमांक 1,4,12,13,15,16,18,20,22,23,24,25, 27,29,31,32,34,35,36 आणि 37 मधून भाजप चार सदस्यांचे पॅनेल निवडून आले. याप्रभाने भाजपे एकाच फटक्यात 80 नगरसेवक निवडून देऊन परत एकदा सत्तेवर बसवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT