Sunil Kedar. Sarkarnama
विदर्भ

Nagpur NDCCB Bank : सुनील केदार यांच्या आमदारकीचा निर्णय नार्वेकरांच्या 'कोर्टात'

MLA sunil kedar News : केदार यांच्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale

Nagpur News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक (NDCCB) घोटाळाप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेले काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना काल (22 डिसेंबर) रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे.

नागपूर पोलिसांनी केदार यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची माहिती विधिमंडळास दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुनील केदार यांची आमदारकी जाणार की राहणार याचा निकाल आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या 'कोर्टात'लागणार आहे. नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

केदार यांच्या वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागण्याची तयारी केली आहे. न्यायदंडाधिकारी कोर्टाच्या निकालानंतर केदार यांचे विधिज्ञ तातडीने उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारीत आहेत. उच्च न्यायालयाने केदार यांना दिलासा न दिल्यास त्यांचे विधानसभा सदस्यत्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर केदार यांना अचानक काल रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. रुग्णालयात गेल्यानंतर केदार यांनी मायग्रेनचा त्रास झाल्याचे सांगितले. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी ECG काढला आहे. अतिदक्षता विभागामध्ये सध्या सुनील केदार यांच्या अन्य चाचण्या केल्या जात आहेत.

काल (22 डिसेंबर) नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक (NDCCB) घोटाळा प्रकरणात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या घोटाळ्यात केदार यांना नागपूर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरविले होते. शिवाय साडेबारा लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला. घोटाळा उघडकीस आल्याच्या तब्बल 22 वर्षांनंतर याचा निकाल लागला आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे नेते असून ते माजी मंत्री आहेत.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT