Devendra Fadnavis, Sanjay Raut, Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : "हम साथ साथ है म्हणणारेच आता..."; राऊतांच्या काँग्रेसवरील टीकेवरून फडणवीसांची टोलेबाजी

Jagdish Patil

Nagpur News, 09 Oct : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचा या राज्यात पराभव होईल असं वाटत असतानाही भाजपने एकहाती विजय खेचून आणला. याच निकालावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

एकीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी या हरियाणातील निकालावरून आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर राऊतांच्या याच टीकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

"हम साथ साथ है म्हणणारे हम तुम्हारे है कौन?' असं म्हणायला लागलेत. फेक नरेटीव्ह संपलेलं आहे. हेच हरियाणाच्या निवडणुकीतून दिसलं असून आता लोक भाजपच्या पाठीशी आहेत," असं म्हणत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला. ते नागपूर (Nagpur) येथे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील 7600 कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पणाचा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित केलेला आहे. यावेळी देवेंद्र फडवणीसांनी (Devendra Fadnavis) राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

यावेळी बोलताना ते म्हणाले, "भाजप (BJP) हरियाणा हरेल आणि त्यांच्यावर आम्ही हल्ला करू, अशा तयारीत शरद पवार, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस बसले होते. पण पण देशाचा मूड आता त्यांच्याही लक्षात आला असेल. 'हम साथ साथ है म्हणणारे हम तुम्हारे है कौन?' असे म्हणायला लागल्याचं पाहायला मिळत आहे. आता फेक नरेटीव्ह संपलं आहे हेच हरियाणाच्या निवडणुकीतून दिसून आलं आहे. लोक आता भाजपच्या पाठीशी आहे."

यावेळी फडणवीस यांनी ते अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री असताना मंजूरी दिलेल्या कामाची माहिती सांगितली. ते म्हणाले मी अर्थमंत्री असताना आठ नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील पाच हे विदर्भातील असल्याचं सांगितलं. तसंच या कॉलेजमुळे महाराष्ट्राच्या मेडिकल सीटमध्ये मोठी वाढ होईल आणि त्याचा फायदा होईल.

स्वप्नपूर्तीचा दिवस

तर आपण मुख्यमंत्री असताना नागपूर विमानतळाचं टेंडर दिलं होतं. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं साडेचार वर्षानंतर कोर्टाची मान्यता मिळाल्यानंतर आज भूमिपूजन होत आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून इथे देशातील आधुनिक विमानतळ तयार होत आहे.

नागपूर आणि महाराष्ट्राच्या विकासात भर घालणार एअरपोर्ट ठरणार आहे. शिर्डीला आता सुंदर एअरपोर्ट मिळणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून 80 टक्के पेपर सुटला आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल्व्ह होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील निकालावर बोलताना राऊत म्हणाले, "काँग्रेसचा पराभव दुर्दैवी आहे. हरियाणात इंडिया आघाडीतील पक्ष एकत्रपणे लढले असते तर फायदा झाला असता. पण काँग्रेसला वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस दुबळी आहे, तिथे ते प्रादेशिक पक्षांची मदत घेते. जिथे काँग्रेस मजबूत आहे तिथे ते प्रादेशिक पक्षांना महत्त्व देत नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT