NCP Politics : अजितदादांचा मोठा नेता तुतारी हाती घेणार? सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाताना चेहरा लपवल्याचा VIDEO व्हायरल

Sharad Pawar's NCP Politics Supriya Sule car Viral Video : एका नेत्याने मंगळवारी शरद पवारांची त्यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवास्थानी भेट घेतली. त्यानंतर ते सुप्रिया सुळेंच्या गाडीतून बाहेर जात असताना या नेत्याने माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून आपला चेहरा फाईलने लपवला होता. ज्याचा VIDEO व्हायरल होत आहे.
Rajendra Shingne to join NCPs Sharad Pawar party
Rajendra Shingne to join NCPs Sharad Pawar partySarkarnama
Published on
Updated on

Pune News, 09 Oct : राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून यासाठी प्रत्यक पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे.

यासाठी विविध यात्रा, मेळाव्यांचे आयोजन केलं जात आहे. इच्छुकांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी धावपळ सुरू केली आहे. सध्या ज्या पक्षात आहे तिथे उमेदवारी नाकारल्यास ते दुसऱ्या पक्षात जाण्यासाठीही फिल्डिंग लावत आहेत.

नुकतेच भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. शिवाय आगामी काळात आणखी काही नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेतही शरद पवारांनी दिले आहेत. अशातच आता माजी मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) हे देखील अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चां सुरू झाल्या आहेत.

या चर्चा सुरू होण्याला कारणीभूत ठरला आहे एक व्हायरल व्हिडिओ. एका नेत्याने मंगळवारी शरद पवारांची (Sharad Pawar) त्यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवास्थानी भेट घेतली. त्यानंतर ते सुप्रिया सुळेंच्या गाडीतून बाहेर जात असताना या नेत्याने माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून आपला चेहरा फाईलने लपवला होता. तर या व्हिडिओतील नेता अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगेणे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Rajendra Shingne to join NCPs Sharad Pawar party
Rahul Gandhi : एका राज्यात सत्ता येऊनही राहुल गांधींचे फटाके वाजलेच नाहीत! कोणता बॉम्ब फुटणार?

त्यामुळे आता राजेंद्र शिंगणे अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडून तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तर शिंगणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देखील दिली होती. त्यामुळे आता ते पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Rajendra Shingne to join NCPs Sharad Pawar party
Assembly Election 2024 : हरियाणाच्या निकालानंतर महाविकास आघाडीत जाण्यासाठी कुंपणावर बसलेले भाजपचे नेते काय करणार?

दरम्यान, भाजप नेते समरजीत घाटगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा भाजपला अखेरचा रामराम केला आहे. शिवाय आणखी काही नेते तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिले आहेत. त्यामुळे आणखी कोण कोण नेते महायुतीतून बाहेर पडणार याकडे नेत्यांसह जनतेच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता राजेंद्र शिंगणे यांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास केल्याच्या चर्चांमुळे ते देखील पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com