Nagpur residents protest unreliable power supply  Sarkarnama
विदर्भ

Nagpur News: ऊर्जामंत्र्यांच्या होमटाऊनमध्ये रोज होते बत्तीगुल! 50 कोटींचा निधी तरीही वीजेचा खेळ सुरूच

Nagpur Citizens Suffer Electricity Supply Problems: निधी उपलब्ध असतानाही महावितरणचे अधिकारी चालढकल करीत आहे. याची झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. महिनाभरापासून वीजेचा खेळ सुरू आहे. नाही.

Rajesh Charpe

Nagpur, 22 Apr 2025: नागपूरचा पारा चांगलाच चढला आहे. देशातील टॉपटेन 'व्हॉट' शहरामध्ये नागपूरची नोंद झाली आहे. प्रचंड उकाडा, गर्मीने नागरिक हैराण झाले आहेत. यात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आणखीच हाल होत आहेत.

दररोज रात्री-बेरात्री केव्हाही वीज पुरवठा खंडीत होत नागरिकांची झोप उडत आहे. याची दखल कुठलाच लोकप्रतिनिधी घेत नसल्याने आज नागरिकांनी हिवरीनगर पॉवर स्टेशनवर धडक देऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था सुरळीत व अत्याधुनिक करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून महावितरणला वाठोडा परिसरात ट्रांसफॉर्मेशन, सबस्टेशन उभारायचे होते. निधी उपलब्ध असतानाही महावितरणचे अधिकारी चालढकल करीत आहे. याची झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. महिनाभरापासून वीजेचा खेळ सुरू आहे. दिवसातून किमान पाच वेळा वीज पुरवठा खंडित होता. तो केव्हा होईल याचा काही नेम नाही.

सध्या नागपूरचे तापमान ४४ डिग्रीच्यावर गेले आहे. पंखा लावला तरी थंडावा निर्माण होत नाही. अशात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मध्यरात्री केव्हाही वीज जाते. त्यामुळे सर्वांचीच झोपमोड होत आहे. आमदार आणि लोकप्रतिनिधींना सांगितल्यानंतरही कोणी दखल घेत नसल्याचे बघून नागरिकांची आंदोलनाचा पवित्रा घेतला.

त्यांच्या सोबतीला भाजपचे माजी नगरसेवक नरेंद्र बोरकर होते. तोडफोड व मारझोडीचीच भाषा महावितरणच्या अधिकाऱ्यांना समजते काय असा सवाल नागरिकांनी यावेळी केला. पूर्व नागपूरमधून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाचा चौकार मारला आहे. विक्रमी मतांनी ते निवडूण आले आहेत. विदर्भातून सर्वाधिक मताधिक्यांनी ते निवडूण येण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.

भाजपचे सर्वाधिक नगरसेवक पूर्व नागपूरमधून निवडूण येतात. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान हेसुद्धा याच भागात राहतात. स्मार्ट सिटी याच परिसरात विकसित केली जात आहे. अलीकडेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असल्याचे सांगितले होते. असे असताना महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सर्वाधिक त्रास या परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT