Nagpur Politics: नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. याचा काही बड्या नेत्यांना याचा फटका बसला आहे तर काही प्रभागांमध्ये एकाच पक्षाचे तीन तीन प्रबळ दावेदारांसाठी एकच जागा लढण्यासाठी शिल्लक राहिली आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष निर्माण होणार असल्याचे दिसून येते. प्रभाग क्रमांक ३१मध्ये दोन माजी उपमहापौर आणि एक निष्ठावंत माजी नगरसेवक यापैकी एकाची निवड करताना काँग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे.
प्रभाग २२मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती भाजपचे बाल्या बोरकर यांना एकमेकांच्या विरोधात लढण्याशिवाय पर्याय राहिला नाहीत. याच प्रभागात काँग्रेसचे माजी महापौर नरेश गावंडे हेसुद्धा प्रबळ दावेदार आहेत.
मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३१मधून चारही भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्यात माजी उपमहापौर सतीश होले, माजी उपमहापौर छोटू भोयर आणि दोन महिला नगरसेवकांचा समावेश होता. होले यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत धवड यांना पराभूत केले होते. आता होले काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. छोटू भोयर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षापासून दुरावले आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत धवड येथून प्रबळ दावेदार आहेत.
या प्रभागातील खुल्या प्रवर्गाच्या दोन्ही जागा महिलेसाठी राखीव झाल्या आहेत. एक जागा अनुसूचित जातीला गेली आहे. या प्रभागातून काँग्रेसचे माजी नगरसेवक योगेश तिवारी हेसुद्धा लढले होते. आरक्षणामुळे सर्वाधिक अडचण काँग्रेसची झाली आहे. चार दावेदारांपैकी काँग्रेसला कुठल्यातरी एकाचीच निवड करावी लागणार आहे. यामुळे कुणा एकाला आजूबाजूच्या प्रभागात आसरा घ्यावा लागणार आहे.
मागील निवडणुकीत प्रभाग २२ची निवडणूक चांगलीच गाजली होती. येथून तीन भाजपचे तर एकमेव राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे हे निवडून आले होते. काँग्रेसचे माजी महापौर नरेश गावंडे यांना भाजपच्या बाल्या बोरकर यांनी पराभवाचा धक्का दिला होता. भाजपचे सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदार कृष्णा खोपडे यांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता. पेठे यांच्या विजयामुळे भाजपमध्ये एकमेकांकडे संशयाने बघितल्या जात होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पेठे हे एकमेव उमेदवार या निवडणुकी निवडून आले होते. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना कृष्णा खोपडे यांच्या विरोधात उभे केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.