Prashant Kishor : मोदींना केंद्रात सत्तेचा मार्ग दाखवणाऱ्या प्रशांत किशोर यांची जादू फेल! बिहारचे एक्झिट पोल काय सांगतात?

Bihar Exit Poll : बिहारच्या विकासाचं नवं मॉडेल घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची जादू दिसणार नसल्याचं एक्झिट पोल्सनं म्हटलं आहे.
Prashant Kishor defamation case
Prashant Kishor Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Exit Poll 2025 : बिहारमध्ये दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर काही वेळातच मतदानोत्तर चाचण्यांचे कल अर्थात एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. सात विविध सर्व्हे कंपन्यांनी जाहीर केलेल्या पोलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात सत्तेचा मार्ग दाखवणाऱ्या आणि बिहारच्या विकासाचं नवं मॉडेल घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची जादू दिसणार नसल्याचं म्हटलं आहे.

Prashant Kishor defamation case
Karuna Munde: "अचानक मी झोपेतून उठले अन् आचारसंहिता लागली"; करुणा मुंडेंनी का व्यक्त केलं आश्चर्य?

कोणाचा पोल काय म्हणतोय?

  1. मॅट्रिझ - एनडीए (१४७-१६७), महागठबंधन (७०-९०), जनसुराज्य पार्टी (०-२), इतर (२-८)

  2. पी-मार्क - एनडीए (१४२-१६२), महागठबंधन (८०-९८), जनसुराज्य पार्टी (१-४), इतर (०-३)

  3. चाणक्य स्ट्रॅटेजिज- एनडीए (१३०-१३८), महागठबंधन (१००-१०८), जनसुराज्य पार्टी (०-०), इतर (३-५)

  4. पिपल्स इनसाईट - एनडीए (१३३-१४८), महागठबंधन (८७-१०२), जनसुराज्य पार्टी (०-२), इतर (३-६)

  5. पिपल्स प्लस - एनडीए (१३३-१५९), महागठबंधन (७५-१०१), जनसुराज्य पार्टी (०-५), इतर (२-८)

  6. जेव्हीसी - एनडीए (१३५-१५०), महागठबंधन (८८-१०३), जनसुराज्य पार्टी (०-१), इतर (३-६)

Prashant Kishor defamation case
ZP Election 2025: जिल्हा परिषद निवडणुकीची लवकरच होणार घोषणा; 'या' दिवशी वाजणार बिगुल? राजकीय चर्चांना उधाण

या सहा पोल्सनं प्रशांत किशोर यांच्या पक्षाला दोन आकडी संख्या गाठता येणार नाही, असं आपल्या पोलमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं नव्या बिहारचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्याकडं मात्र बिहारच्या जनतेनं दुर्लक्ष केलंय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. अर्थात हे केवळ अंदाज आहेत, प्रत्यक्षात १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर जे आकडे समोर येतील, त्यानंतरच प्रशांत किशोर यांच्याबाबत नेमकेपणानं भाष्य करता येईल.

Prashant Kishor defamation case
Bihar Election Voting: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

दरम्यान, गेल्या निवडणुकीत एक्झिट पोल्सनं वर्तवलेले अंदाज चुकले होते. लोकसभा निवडणुकीवेळी देखील एक्झिट पोल्सची वाट लागली होती. त्यामुळं या एक्झिट पोल्सची म्हणावी अशी विश्वासार्हता दिसून येत नाही. पण प्रत्यक्षात निकालाच्या जवळ जरी हे अंदाज गेले तरी एक्झिट पोल्सचं सर्व्हेक्षण एनडीएचा मात्र मोठा विजय ठरु शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com