Karuna Munde: "अचानक मी झोपेतून उठले अन् आचारसंहिता लागली"; करुणा मुंडेंनी का व्यक्त केलं आश्चर्य?

Karuna Munde: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Karuna Munde
Karuna Munde
Published on
Updated on

Karuna Munde: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या 'स्वराज्य शक्ती सेना' नामक पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले जाणार आहेत. पण नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर होऊन आठवडा झाला. पण निवडणूक आयोग इतक्या लवकर घोषणा करेल याची कल्पना नव्हती. पण या स्थानिक निवडणुकांसाठी आपली तयारी कशी सुरु आहे, काय रणनिती आपण आखली आहे? याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

Karuna Munde
ZP Election 2025: जिल्हा परिषद निवडणुकीची लवकरच होणार घोषणा; 'या' दिवशी वाजणार बिगुल? राजकीय चर्चांना उधाण

अचानक आचारसंहिता लागली

परळीत नगरपरिषदेची निवडणूक 'स्वराज्य शक्ती सेना' लढणार आहे का? यासाठी काय तयारी केली आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर करुणा मुंडे म्हणाल्या, "अचानक मी झोपेतून उठले तर माहिती पडलं की आचारसंहिता लागली होती. आपली तयारी ही जानेवारीसाठी होती. कारण माध्यमांमध्ये काय दाखवत होते की, पुढील वर्षी जानेवारीमध्ये आचारसंहिता लागणार आहे. पण अचानक आचारसंहिता लागल्यामुळं आमची तयारी नाही. पण तरीही आम्ही प्रयत्न करतोय की, नगराध्यपदाच्या जागेसाठी उमेदवार उभे करणार आहोत"

Karuna Munde
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : माजी महापौर, उपमहापौरांचे प्रभाग आरक्षित; घोडेले, शिंदेंना करावी लागणार शोधाशोध!

कोणासोबत युती करणार?

दरम्यान, करुणा मुंडे यांचा पक्ष आगामी नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार असून, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच, ५ तारखेनंतर युतीबाबत अंतिम निर्णय होईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच आपण स्वतः सध्याच्या कुठल्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणार नसल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

Karuna Munde
Solapur Corporation : सोलापुरात देशमुख, कोठे, नरोटे, चंदनशिवे, शिंदे, जाधव यांचे गड सुरक्षित; भाजपच्या माजी उपमहापौरांची मात्र अडचण

संधी नाकारलेल्यांसाठी काढला पक्ष

मोठ-मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंवा इतर मोठ्या पदांवर काम करणारे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते, त्यांनी आमच्या स्वराज्य शक्ती सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना निवडणुका लढायच्या आहेत याचसाठी त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. कारण कार्यकर्ता म्हणून या लोकांना ३० ते ४० वर्षे झाली पण त्यांना संधी कुठेही मिळाली नाही. त्यासाठी लोकांना संधी देण्यासाठी आपण हा स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष काढला आहे, असंही यावेळी करुणा मुंडे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com