Nagpur, 18 March : औरंगजेबच्या कबरीच्या विरोधात नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हिंदू आणि मुस्लिम बहुलवस्ती असलेल्या हंसापुरी व आसपासच्या परिसरात रात्री जमावाने जाळपोळ केली. रस्त्यावर असलेल्या चारचाकी व दुचाकी फोडल्याने या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाद कोणी घातला आणि कोणामुळे दंगल उसळली यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.
ज्या भागात ही घटना घडली, त्या मध्य नागपूर (Nagpur) विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण दटके यांनी ठरवून ही दंगल घडवल्याचा आरोप केला आहे. दंगलीत फक्त हिंदू समाजाच्या गाड्या आणि घरांना लक्ष्य करण्यात आले होते. दोन गाड्यांच्या मध्ये उभी असलेली मुस्लिमाच्या गाडीला कोणी हात लावला नाही आणि आजूबाजूच्या दोन्ही गाड्या फोडल्या जातात, यावरून हे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. दिवसभर तणावाची परिस्थिती असताना पोलिसांनी ढिलाई दाखवली, पोलिस निरीक्षक संजय सिंग यांनी तत्परता दाखवली नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही दटाके यांचे म्हणणे आहे.
आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांनी दंगल घडलेल्या वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी केली. हंसापुरी भागात मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम राहतात. दोन्ही समाजाची येथे दुकाने आहेत. या रस्त्यावर एरवी मुस्लिम आणि हिंदू दोघांच्याही गाड्या उभ्या असतात. घटना घडली तेव्हा मुस्लिम समाजाची एकही गाडी येथे उभी नव्हती. काही हातठेले होते. मात्र, त्यांना दंगेखोरांनी हात लावला नाही.
बंडू क्लिनिक याच परिसरात आहे. त्यांच्या दावाखान्यात शिरून तोडफोड करण्यात आली आहे. देवघर तोडण्यात आले आहे. एका इमारतीच्या तिसऱ्या मजलावर दगड भिकरावून काचा फोडण्यात आल्या आहेत. दंगल घडवण्यापूर्वी कोणाला टार्गेट करायचे, कोणाच्या गाड्या आणि दुकाने फोडायचे हे आधीच ठरवण्यात आल्याचे यावरून दिसून येते.
दंगलखोरांनी पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक दुकानांसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे तोडल्याचे आढळून आले. जुना हिस्लॉप कॉलेजच्या मागच्या गल्लीत दगडफेक करण्यासाठी आलेल्यांनी दुचाकी पार्क केल्याचे आढळून आले आहे. एकूणच या हल्ल्याची तयारी आधीच करण्यात आली होती. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातून युवकांना आणण्यात आले होते. हा हल्ला प्रीप्लांट होता, असा थेट दावा प्रवीण दटके यांनी केला आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.